Shivsena Politics : शिंदेंना फोडून, सरकार पाडून ठाकरेंना धडा शिकविण्याचा भाजपचा पहिला 'प्लॅन' सफल ठरला. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीतही ठाकरेंना जेरीस आणण्याची एकही संधी मोदी-शहांपासून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी सोडली. अगदी निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आदल्यादिवसापर्यंत शिंदे, फडणवीसांची ठाकरेंचे शिवसैनिक फोडले.
सत्ताधाऱ्यांनी मनी, मसल पॉवर दाखवूनही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे डगमगले नाहीत. उलटपक्षी प्रचाराच्या मैदानावर ताकदीने उतरून फुटीर आणि फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्या भाजपला शब्दांनी फोडून काढले. जिथे कुठे ठाकरेंनी थेट भाजप, शिंदेंच्या शिवसेनेविरोधात (Shivsena) उमेदवार दिले, तिथे प्रचारा धडाका लावून खरी शिवसेना आपल्याकडे असल्याचे दाखवून दिले.
साहजिकच या निवडणुकीत सहानुभूतीचा फायदा होऊन 10-12 खासदार सहज जिंकण्याचा विश्वास ठाकरेंचा नेते बोलून दाखवत होते. अगदीच तसेच काही अंदाज 'एक्झिट पोल'मधून पुढे आले आहेत. म्हणजे, ठाकरे उभे. केलेल्या 22 जागांपैकी डझनभर जागांवर मशाल धगधगू शकते, याकडे एक्झिट पोलने लक्ष वेधले आहे.
त्यासोबतच पोल ऑफ पोलने वर्तवलेल्या अंदाजानुसार शिवसेना ठाकरे गटाला 14 जागा मिळत आहेत. त्यामुळे या वर्तवलेल्या अंदाजामुळे शिवसेना ठाकरे गटात उत्साहचे वातावरण आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Ncp)उभी फूट पडली होती. त्यानंतर राज्यात पहिल्यांदाच निवडणूक पार पडली. अटीतटीची झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची प्रतिष्ठा पणाली लागली होती.
यामध्ये एबीपी-सी वोटरच्या एक्झिट पोल्सने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार महाविकास आघाडीला 23 ते 24 जागांवर यश मिळत आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेला ९ जागा मिळताना दिसत आहेत. त्यामुळे येत्या काळात राज्यात शिवसेना ठाकरे गटाचा दबदबा वाढताना दिसत आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला 8 जागा येताना दिसत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सहा जागा मिळणार आहेत.