Municipal Corporation : अठरा लाख लोकसंख्येचा भार दहावी पास अधिकाऱ्यावर, महापालिकेच्या अग्निशमन विभागाला प्रमुख मिळेना!

Chhatrapati Sambhajinagar Fire Department News : गेल्या तब्बल 9 वर्षापासून या विभागाचा भार हा प्रभारीवर सोपवण्यात आला आहे. दहावी पास निवृत्त अधिकारी सध्या या विभागाचे काम पहात आहेत. महापालिकेत अनेक वर्षांपासून मुख्य अग्निशमन अधिकारी हे पद रिक्त असून, सध्या प्रभारी अधिकाऱ्यावर कारभार सुरू आहे.
Municipal Corporation Chhatrapati Sambhajinagar
Municipal Corporation Chhatrapati SambhajinagarSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्याची पर्यटन राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेला अग्निशमन विभाग प्रमुख गेल्या अनेक वर्षापासून मिळत नाहीये. सात पत्र पाठवल्यानंतरही हे रिक्त पद अद्याप भरण्यात आलेले नाही. झपाट्याने होणारा औद्योगिक विकास, पर्यटकांची होणारी गर्दी आणि शहरातील सर्वसामान्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे पद अत्यंत महत्त्वाचे समजले जाते.

परंतु गेल्या तब्बल 9 वर्षापासून या विभागाचा भार हा प्रभारीवर सोपवण्यात आला आहे. दहावी पास निवृत्त अधिकारी सध्या या विभागाचे काम पहात आहेत. महापालिकेत अनेक वर्षांपासून मुख्य अग्निशमन अधिकारी हे पद रिक्त असून, सध्या प्रभारी अधिकाऱ्यावर कारभार सुरू आहे. या पदावर कायमस्वरूपी अधिकारी मिळावा यासाठी महापालिकेने सात वेळा शासनाकडे प्रस्ताव पाठवला.

मात्र, तरीही अधिकारी मिळालेला नाही. सध्या एक निवृत्त अधिकारी हे काम पाहत आहेत. ते फक्त दहावी पास असून, १८ लाख लोकसंख्येच्या अग्निप्रबंधाचा आणि सुरक्षेचा भार अशा अल्पशिक्षित अधिकाऱ्यावर कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महापालिकेचे नियमित मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झणझण हे निवृत्त होऊन नऊ वर्षे उलटली आहेत, तेव्हापासून हे पद रिक्त आहे.

Municipal Corporation Chhatrapati Sambhajinagar
Bhum Municipal Council : खळबळजनक! नगरसेवकांकडून माझ्या जीविताला धोका', भूम नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांनी केली पोलीस संरक्षणाची मागणी!

मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यासाठी विज्ञान शाखेतील पदवीनंतर अग्निशमन क्षेत्रातील अभ्यासक्रम किंवा ‘बी.ई. फायर इंजिनिअरिंग’ आणि डिव्हिजनल फायर ऑफिसर म्हणून काम केल्याचा अनुभव असणे गरजेचे आहे. परंतु, अग्निशमन विभागात असा अर्हताप्राप्त अधिकारी उपलब्ध नसल्याने महापालिकेकडून वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पदभार सोपवला जातो.

Municipal Corporation Chhatrapati Sambhajinagar
Shivsena News: एकनाथ शिंदेंची विदर्भात मोठी खेळी, दर्यापूर नगरपरिषदेचं राजकारणच फिरवलं; काँग्रेसचे तब्बल 19 नगरसेवक फोडले

अशोक खांडेकर हे देखील दोन महिन्यांपूर्वी निवृत्त झाले आहेत. मात्र, त्यांना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देऊन सध्या पदभार देण्यात आला आहे. शहराच्या अग्नी सुरक्षेसंदर्भात मंगळवारी (ता. २५) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. अमरावती येथील दुर्घटनेत तीन बालकांचा मृत्यू झाला, त्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर शहराच्या अग्नी सुरक्षेसंदर्भात गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे, असे मत नगरसेवकांनी व्यक्त केले.

Municipal Corporation Chhatrapati Sambhajinagar
Sunetra Pawar Setback : सुनेत्रा पवारांच्या हातातून नगरपंचायत गेली; नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षसह 15 नगरसेवक शिवसेनेत

प्रमोद राठोड, शिवाजी दांडगे, राजगौरव वानखडे यांच्यासह इतरांनी अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. त्यात अग्निशमन विभागातील अधिकाऱ्याच्या पदोन्नतीचा विषय चर्चेत आला. या विभागात निवृत्त अधिकाऱ्याला कायम ठेवून प्रशासन काय साध्य करत आहे? असा प्रश्न नगरसेवकांनी विचारला.

दरम्यान, खुलासा करताना अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी सांगितले, ‘या पदावर अधिकारी मिळावा यासाठी शासनाकडे आतापर्यंत सात पत्रे पाठवली आहेत. मात्र, अजूनही अधिकारी मिळालेला नाही. खांडेकर हे दहावी पास असले तरी त्यांनी अग्निशमन दलाच्या विविध पदांवर काम केले आहे.’

आयुक्त अमोल येडगे म्हणाले, ‘पदोन्नती देताना योग्य अनुभव नसल्याने अडचणी येतात. त्यामुळे नवीन अधिकारी मिळेपर्यंत खांडेकर यांना नियुक्ती देण्यात आली आहे. शासनाकडून अधिकारी मिळताच त्यांची नियुक्ती संपुष्टात येईल.’ यासंदर्भात महापौर समीर राजूरकर यांनी काल आम्ही सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. त्यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी या पदावर कायमस्वरूपी अधिकारी मिळावा, अशी मागणी करण्यात आली, अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com