Chhatrapati Sambhajinagar News: महापालिकेच्या 'जीबी'चा झाला आखाडा, 'वंचित'च्या गटनेत्यानं उगारला माईक, विरोधी पक्षनेत्यानेही थोपटले दंड

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation: छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आतापर्यंत झालेल्या चारही सर्वसाधारण सभा या विकासाच्या मुद्यांपेक्षा एकमेकांवरील कुरघोडी, आरोप-प्रत्यारोप आव्हानाची भाषा, निषेध, बायकाॅट, नगरसेवकांचे निलंबन, नामांतराचा मुद्दा या भोवतीच घुटमळल्या.
Chhatrapati Sambhajinagar News
Chhatrapati SambhajinagarSarkarnama
Published on
Updated on

VBA-Aimim News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आतापर्यंत झालेल्या चारही सर्वसाधारण सभा या विकासाच्या मुद्यांपेक्षा एकमेकांवरील कुरघोडी, आरोप-प्रत्यारोप आव्हानाची भाषा, निषेध, बायकाॅट, नगरसेवकांचे निलंबन, नामांतराचा मुद्दा या भोवतीच घुटमळल्या. महापालिकेत भाजपाची शत-प्रतिशत सत्ता आली, सगळी महत्त्वाची पद याच पक्षाकडे आहे. त्यामुळे महापालिकेत खऱ्या अर्थाने आता विकासकामाला गती येईल, अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा होती.

परंतु, नगरसेवकांच्या वर्तनाने महापालिकेची सर्वसाधारण सभा आणि सभागृह अक्षरशः आखाडा बनल्याचे चित्र होते. अर्थसंकल्पात प्रत्येक पक्षाला वाटप झालेल्या निधीवरून सत्ताधारी भाजपावर भेदभाव केल्याचा आरोप केला जात आहे.

सर्वसाधारण सभेत यावरूनच वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचे नगरसेवक एकमेकांना भिडले होते. या वादातून वंचितचे गटनेते अफसर खान यांनी एमआयएमच्या नगरसेवकांवर माईक उगारला, तर त्याला एमआयएमचे विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर यांनी प्रतिआव्हान देत दंड थोपटला.

नागरिकांचे प्रश्‍न, शहर विकासाच्या संकल्पना मांडण्यासाठी असलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे सभागृह म्हणजे राजकारणाचा अड्डा बनले. प्रत्येक सभेत सत्ताधारी भाजप, शिवसेना व एमआयएम नगरसेवकांमध्ये विकासाच्या नव्हे तर धार्मिक आणि नामांतराच्या विषयावरून खडाजंगी सुरू आहे. सोमवारी अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण सभा असताना वंचित बहुजन आघाडी व एमआयएम पक्षाच्या सदस्यांनी एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले.

Chhatrapati Sambhajinagar News
Modi Government decision : अखेर मोदी सरकारकडून ऐतिहासिक निर्णयाची अधिकृत घोषणा; ममतादीदींच्या जुन्या सहकाऱ्यावर सोपविली अत्यंत महत्वाची कामगिरी

त्यात सत्ताधारी भाजप-शिवसेना नगरसेवकांनी तेल घालण्याचे काम केले. जनतेच्या पैशातून चालणाऱ्या सर्वसाधारण सभेचे चित्र पाहून ‘कालचा गोंधळ’ बरा होता, असे म्हणण्याची वेळ आली. सभा सुरू होताच सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान करणाऱ्या एमआयएम नगरसेवकावर कारवाई होईपर्यंत सभागृह चालू देणार नाही, असा इशारा दिला. त्यात बालाजी मुंडे, जालिंदर शेंडगे यांनी संबंधितावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली.

या विषयावर पडदा पडताच वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक अफसर खान यांनी सभागृहात व्हीडीओ दाखवत प्रकाश आंबेडकरांमुळे यांचे नेते खासदार झाले आणि आता एमआयएम पक्षाचे नगरसेवक त्यांची बदनामी करत आहेत, 'आम्ही भाजपच्या रांगेत बसतो, म्हणून जास्‍त निधी मिळाला, अशी बदनामी केली जात आहे. एमआयएमच खरी भाजपची बी टीम आहे', असा आरोप अफसर खान यांनी केला.

Chhatrapati Sambhajinagar News
Raigad Politics : गोगावले विरूद्ध तटकरे असा सामना रंगलेल्या म्हसळा नगरपंचायतीत निवडणूक; नगराध्यक्ष निवडीनं समीकरणे बदलणार?

त्यावर विरोधीपक्षनेते समीर साजेद बिल्डर, ओसामा कदीर मौलाना, काकासाहेब काकडे यांच्यासह इतरांनी आक्षेप घेतल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला. महापौर समीर राजूरकर यांनी ही सभा अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आहे, त्यामुळे इतर विषय इथे उपस्थित करू नका, असे वारंवार आवाहन केले, पण नगरसेवकांचा गोंधळ सुरूच होता.

दरम्यान, अमित भुईगळ म्हणाले, आम्ही कुठे बसतोय? निधी किती मिळतोय? यावरून तुमच्या पोटात का दुखते? असा प्रश्‍न केला. समीर बिल्डर यांनी उठसूठ एमआयएम नगरसेवकांना टार्गेट केले जात आहे. तुमच्या दादागिरी समोर झुकणार नाही, असा इशारा दिला. त्यावर अफसर खान यांनी सभागृहातच दंड थोपडून आव्हान दिले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Chhatrapati Sambhajinagar News
Amol Mitkari Jay Pawar MLC : 'दादानंतर भविष्यात हा चेहरा महाराष्ट्रासाठी...'; जय पवारांबाबत मिटकरींची सुनेत्रा पवारांकडे सर्वात मोठी मागणी

एमआयएम नगरसेवक निलंबित

गेल्या आठवड्यात मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत एमआयएम पक्षाचे नगरसेवक फिरोज खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान केल्याच्या कारणावरून सर्वसाधारण सभेत गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर आज सोमवारच्या सभेसाठी महापौरांनी त्यांचे एक दिवसासाठी निलंबन केले. विशेष म्हणजे फरोज खान आजच्या सभेला गैरहजर होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com