Amol Mitkari Jay Pawar MLC : 'दादानंतर भविष्यात हा चेहरा महाराष्ट्रासाठी...'; जय पवारांबाबत मिटकरींची सुनेत्रा पवारांकडे सर्वात मोठी मागणी

Political News : महायुतीतील दुसरा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेमध्ये दोन विधान परिषदेच्या जागांसाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळत आहे. दोनमधील एका जागेवर विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या नीलम गोऱ्हे या पुन्हा आमदार म्हणून जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Amol Mitkari Jay Pawar SUnetra Pawar .jpg
Amol Mitkari Jay Pawar SUnetra Pawar .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : सध्या राज्याच्या राजकारणामध्ये विधान परिषदेच्या उमेदवारीवरून राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे भाजपकडे विधान परिषदेच्या तब्बल सहा जागा आहेत. या सहा जागांसाठी तब्बल 26 जणांची नावे चर्चेत असून पुढील दोन दिवसांमध्ये यातील सहा नावांवर दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगितले जात आहे.

महायुतीतील दुसरा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेमध्ये दोन विधान परिषदेच्या जागांसाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळत आहे. दोनमधील एका जागेवर विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या नीलम गोऱ्हे या पुन्हा आमदार म्हणून जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसऱ्या जागेवर काही अटी आणि शर्तीसह माजी आमदार बच्चू कडू यांच्या नावाची देखील चर्चा आहे.

या महायुतीतील दोन मित्रपक्षांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका जागेसाठी प्रचंड रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळत आहे. या एका जागेसाठी प्रत्येक शहरातून मोठ्या प्रमाणात इच्छुका ची नावे पक्षश्रेष्ठींकडे पोहोचत आहेत. तसेच वरिष्ठ नेते, आमदार देखील आपल्या भागातील नेत्याला उमेदवारी मिळावी म्हणून जोर लावताना पाहायला मिळत आहेत.

Amol Mitkari Jay Pawar SUnetra Pawar .jpg
BJP News : भाजपकडून विधान परिषदेसाठी मराठवाड्यातील डझनभर नावांची चर्चा; संधी कोणाला मिळणार?

त्यामुळे ही जागा कोणाच्या पदरात पडणार हे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा असलेल्या सुनेत्रा पवार ठरवणार आहेत. या राष्ट्रवादीच्या विधान परिषदेच्या रेसमध्ये आमदार अमोल मिटकरी देखील असल्याचं बोललं जात आहे. मात्र त्यांच्या नावाला पक्षातील इतर वरिष्ठ नेते मंडळींचा विरोध असल्याचे देखील सांगितलं जात आहे.

Amol Mitkari Jay Pawar SUnetra Pawar .jpg
Shivsena UBT And NCP SP Leader Join Shivsena : लातूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह ठाकरेंच्या पक्षाला दणका; माजी राज्यमंत्र्यासह बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेत!

यापार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी एक मोठी मागणी केली आहे. त्याबाबत त्यांनी सोशल मीडिया वर पोस्ट केली असून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांना ही विधान परिषदेची उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांनी त्या पोस्टद्वारे केली आहे

Amol Mitkari Jay Pawar SUnetra Pawar .jpg
Maharashtra MLC Election : महायुती-मविआची विधानपरिषदेसाठी तिरपी चाल; उमेदवारांच्या नावांची घोषणा मुद्दामहून रोखली? पुढील तीन दिवसांत कुणाचं नशीब फळफळणार ?

या पोस्टमध्ये अमोल मिटकरी म्हणाले,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी कार्यकर्ते व नेत्यांच्या जवळच्या लोकांची लॉबिंग व चढाओढ पाहता आगामी काळात राज्यभर पक्षवाढीसाठी अजितदादांसारखा विश्वासु व युवा चेहरा पुढे आणण्याची आवश्यकता आहे.

Amol Mitkari Jay Pawar SUnetra Pawar .jpg
Maharashtra MLC Election : महायुती-मविआची विधानपरिषदेसाठी तिरपी चाल; उमेदवारांच्या नावांची घोषणा मुद्दामहून रोखली? पुढील तीन दिवसांत कुणाचं नशीब फळफळणार ?

सद्यस्थिती जय पवार हे नाव या जागेसाठी सर्वोत्तम आहे.कदाचित इतरांना घराणेशाही वाटेल ते वाटू देत मात्र दादा नंतर भविष्यात हा चेहरा महाराष्ट्रासाठी दादांसारखाच आश्वासक वाटतो.दादांची उणीव भरून करण्याची क्षमता असलेला हा चेहरा राष्ट्रवादी पक्षासाठी संजीवनी ठरेल..अर्थात अंतिम निर्णय पक्षाचा ! असल्याचा त्यांनी नमूद केला आहे.

Amol Mitkari Jay Pawar SUnetra Pawar .jpg
Maharashtra MLC Election: एकाच मतदारसंघातून दोन माजी आमदारांनी लावली विधान परिषदेसाठी जोरदार फिल्डिंग; कोण बाजी मारणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com