Modi Government decision : अखेर मोदी सरकारकडून ऐतिहासिक निर्णयाची अधिकृत घोषणा; ममतादीदींच्या जुन्या सहकाऱ्यावर सोपविली अत्यंत महत्वाची कामगिरी

Dinesh Trivedi Appointed : परराष्ट्र मंत्रालयाकडून उच्चायुक्त पदावर साधारणपणे भारतीय परराष्ट्र सेवेतील (IFS) अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. मात्र अनेक वर्षांनंतर सरकारने राजकारणातील कसलेल्या नेत्याच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकली आहे.
Dinesh Trivedi with PM Narendra Modi
Dinesh Trivedi with PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

India Bangladesh relations : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार आज संपला. राज्यात सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने जोरदार कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे अनेक नेते राज्यात तळ ठोकून होते. एकीकडे प्रचाराचा धडाका सुरू असताना दुसरीकडे राज्यातील नेत्यांवर महत्वाची कामगिरी सोपविली जात आहे.

प्रचाराची मुदत संपण्याआधीच केंद्र सरकारने पक्षाचे ज्येष्ठ नेते दिनेश त्रिवेदी यांची बांग्लादेशमधील भारताचे नवे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे. त्रिवेदी यांचे बंगालशी जुने नाते आहे. ते अनेक वर्षे तृणमूल काँग्रेसमध्ये होते. तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना केंद्रात मंत्रिपदही मिळाले होते.

त्रिवेदी यांची नियुक्ती बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही महत्वाची मानली जात आहे. तसेच बांग्लादेश आणि भारतातील बिघडलेले संबंध पुन्हा बळकट करण्यासाठीही हे महत्वाचे पाऊल मानले जात आहे. भारताच्या कुटनीतिक धोरणामध्ये सरकारकडून केल्या जात असल्याच्या बदलाचे संकेतही या निर्णयामुळे मिळाले आहेत.

Dinesh Trivedi with PM Narendra Modi
Raghav Chadha news : राघव चड्ढा यांच्याच विधेयकामुळे फिरला असता सगळा राजकीय डाव; खासदारकीसह भाजपमध्ये प्रवेश करणे झाले असते अशक्य...

परराष्ट्र मंत्रालयाकडून उच्चायुक्त पदावर साधारणपणे भारतीय परराष्ट्र सेवेतील (IFS) अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. मात्र अनेक वर्षांनंतर सरकारने राजकारणातील कसलेल्या नेत्याच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकत ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. मागील काही महिन्यांतील बांग्लादेशची स्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे.

विद्यार्थी आंदोलनानंतर बांग्लादेशात आगडोंब उसळला होता. त्यानंतर देशात सत्तांतर झाले. या काळात अनेक हिंदूंवर अत्याचार झाले. अजूनही देशातील स्थिती फारशी स्थिरावलेली नाही. अशा काळात त्रिवेदी यांच्यावर भारत आणि बांग्लादेशातील संबंध अधिक बळकट करण्याची जबाबदारी सरकारने टाकली आहे.

Dinesh Trivedi with PM Narendra Modi
‘आप’ खासदारांच्या बंडानंतर काही तासांतच 'या' स्टार खेळाडूने हाती घेतला 'झाडू'

असे आहे त्रिवेदी यांची राजकीय वाटचाल

दिनेश त्रिवेदी हे UPA सरकारमध्ये रेल्वेमंत्री आणि आरोग्य राज्यमंत्री होते. त्यावेळी ते तृणमूल काँग्रेसमध्ये होते. रेल्वे भाडेवाढीच्या निर्णयानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. २०१९ पर्यंत ते लोकसभेचे खासदार होते. त्यानंतर त्यांना तृणमूल काँग्रेसकडूनच राज्यसभेवर पाठविण्यात आले होते. अनेक वर्षांच्या तृणमूल मधील वाटचालीनंतर त्यांनी 2021 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com