Mahavikas Aghadi News : महाविकास आघाडी करायची असेल तर...; काँग्रेसचा आकडा ऐकून उद्धवसेना घायाळ!

Chhatrapati Sambhajinagar Election Updates: छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस अशी 'महा'आघाडी आकारास येऊ पाहत आहे. शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी कालच या संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले होते.
 Uddhav Thackeray, Congress
Uddhav Thackeray, Congress Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये जसे युतीचे गुऱ्हाळ सुरू आहे, तसंच ते महाविकास आघाडीमध्येही पहायला मिळतं आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस अशी 'महा'आघाडी आकारास येऊ पाहत आहे. शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी कालच या संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले होते.

दरम्यान, महाविकास आघाडीसाठी काँग्रेसकडून 115 पैकी तब्बल 65 जागांची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे केल्याची माहिती आहे. हा आकडा ऐकून शिवसेनेचे नेते अवाक झाले आहेत. परंतु एवढ्या जागा या काँग्रेस, वंचित आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशा तिघांसाठी मागितल्याचे सांगितले जाते. 2015 मध्ये महापालिका निवडणुकीत काँग्रसे पक्षाचे 10 तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 असे एकूण तेरा नगरसेवक होते. तर शिवसेनेचे 28 नगरसेवक निवडून आले होते.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये आता फूट पडली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत या दोन्ही पक्षांची पिछेहाट झाली आहे. त्या तुलनेत काँग्रेसने चांगले यश मिळवले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीतील जागा वाटपात काँग्रेसला अधिकच्या जागा मिळाव्यात असा, स्थानिक नेत्यांचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या दोन बैठका झाल्या.

त्यात काँग्रेसने 115 पैकी 65 जागांची मागणी केल्यामुळे ठाकरे गटात नाराजी आहे. त्यामुळे बैठकांचे सत्र थांबल्याचे सूत्रांनी सांगितले. महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप महायुतीसाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. त्यासोबतच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू होत्या. काँग्रेसने वंचित सोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला असल्याने महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाविकास आघाडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

 Uddhav Thackeray, Congress
Rahul Gandhi News: मोदी सरकारकडून राहुल गांधींसाठी लावला जातोय 'ट्रॅप', परदेश दौरे अडचणीत? 'या' नेत्याच्या दाव्यानं खळबळ

उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करून भाजपमध्ये प्रवेश केलेले राजू वैद्य यांनी यासंदर्भात पहिली बैठक घेतली. त्यानंतर काँग्रेसचे पदाधिकारी व ठाकरे सेनेचे शहरप्रमुखांची दुसरी बैठक शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात झाली. या बैठकीत 16 प्रभागात तोडगा काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. पुढील बैठक काँग्रेसचे जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे, अंबादास दानवे यांच्यात होईल व तोडगा निघेल, असे सांगितले जात होते.

पण या बैठकीला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. यासंदर्भात दानवे यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले, काँग्रेसतर्फे 60 ते 65 जागांची मागणी केली जात आहे, त्यामुळे तोडगा निघणे अवघड वाटत आहे. आमच्याकडे तब्बल 90 जागांसाठी अर्ज आलेले आहेत, त्यामुळे एवढ्या जागा काँग्रेसला देणे शक्य नाही, असे दानवे यांनी स्पष्ट केले.

 Uddhav Thackeray, Congress
Ajit Pawar News: महापालिका जिंकायचीच..! अजितदादांनी ताकद लावली, 40 स्टार प्रचारकांची फौज मैदानात; मुंडे इन,कोकाटे आऊट

तर काँग्रेसचे जगन्नाथ काळे यांनी आमच्या सुरवातीच्या बैठका राजू वैद्य यांच्यासोबत झाल्या होत्या. त्यांनी सकारात्मकता दाखविली होती. त्यानंतरची बैठक ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासोबत झाल्या. आम्हाला काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडी व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा द्यायच्या आहेत. त्यामुळे 60 ते 65 जागांची मागणी आम्ही केली असल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com