Ajit Pawar NCP Politics
NCP leaders discussing a youth-focused election strategy aimed at Gen Z voters during a key manifesto planning meeting. This reflects the party’s modern municipal election approach.Sarkarnama

Ajit Pawar News: महापालिका जिंकायचीच..! अजितदादांनी ताकद लावली, 40 स्टार प्रचारकांची फौज मैदानात; मुंडे इन,कोकाटे आऊट

NCP 40 star campaigners list : विधानसभेनंतर नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्येही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं राष्ट्रवादीपेक्षा सरस कामगिरी करताना तब्बल 61 जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेनं मिळवलेल्या यशाशी राष्ट्रवादीची तुलना करत अजितदादा आपल्या मंत्री, नेत्यांवर नाराज असल्याचं समोर आलं आहे.
Published on

Pune News: राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी ताकद आणि प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेना युतीत लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंही मुंबई,पुणे पिंपरी चिंचवड या महापालिकांसाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही महापालिका निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या बालेकिल्ल्यात अर्थात पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. ठाकरे बंधूंनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसही एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. पण अद्याप त्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. याचदरम्यान, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोशल मीडियावर महापालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादीची जाहीर केली आहे.

आगामी महापालिका निवडणुकांसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही अनुभवी आणि मातब्बर नेत्यांची फौज मैदानात उतरवली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत अजित पवारांसह,प्रफुल पटेल,सुनील तटकरे,हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे,नरहरी झिरवाळ, नवाब मलिक यांच्यासह आदिती तटकरे,रूपाली चाकणकर या महिला नेत्यांचाही समावेश आहे. अजितदादांनी अभिनेते सयाजी शिंदे यांनाही निवडणुकीच्या मैदानात प्रचारासाठी उतरवलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCP) स्टार प्रचारकांची यादी जाहीर करत आगामी महापालिका निवडणुकीसाठी हम भी किसीसे कम नही हे दाखवून दिलं आहे. या स्टारप्रचारकांवर निवडणूक प्रचारात महायुती सरकारनं केलेली विकासकामं,धोरणात्मक निर्णय मतदारांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी असणार आहे.

Ajit Pawar NCP Politics
Raosaheb Danve News : रावसाहेब दानवेंनी चक्क 39 एकर जमीन फुकट वाटली! कुठे जमीन बळकावणारा अन् कुठे..." भाजप पदाधिकाऱ्याचा अब्दुल सत्तारांवर निशाणा!

विधानसभेनंतर नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्येही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं राष्ट्रवादीपेक्षा सरस कामगिरी करताना तब्बल 61 जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेनं मिळवलेल्या यशाशी राष्ट्रवादीची तुलना करत अजितदादा आपल्या मंत्री, नेत्यांवर नाराज असल्याचं समोर आलं आहे.

प्रत्येकानं नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत प्रामाणिकपणे आणि झोकून देऊन काम केलं असतं, तर शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीच्या जास्त जागा निवडून आल्या असत्या असं सांगत अजितदादांनी प्रमुख नेत्यांसह आमदार,खासदारांवर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.

Ajit Pawar NCP Politics
Maharashtra Government : CM फडणवीस सभापती राम शिंदेंचा शब्द खाली पडू देईनात... खास त्यांच्यासाठी 6 महिन्यांत दुसरा कायदा बदलला!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप-शिवसेना युती आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने असेल हे जाहीर केलं आहे.तर दुसरीकडे अजित पवारांच्या पक्षाचं शरद पवारांसोबतच्या युतीचंही भिजत घोंगडं अशी परिस्थिती आहे.त्यामुळे अजितदादांची राष्ट्रवादी कुठेतरी संभ्रमावस्थेत असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता राष्ट्रवादीकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोशल मीडियावरील X प्लॅटफॉर्मवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात येत असल्याची पोस्ट केली आहे.

Ajit Pawar NCP Politics
Mahapalika Nivadnuk : युती जाहीर केलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत काडीमोड : जागा वाटपाची बोलणी फिस्कटताच तडकाफडकी निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्वसमावेशक, पुरोगामी व परिवर्तनवादी लोकाभिमुख भूमिका,आपल्या सर्व स्टार प्रचारकांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, तळागाळातील जनसामान्यांपर्यंत परिणामकारक व प्रभावीरीत्या पोहोचेल, तसेच राष्ट्रवादी विचारांतून येत्या काळात महानगरपालिकांमध्ये महाराष्ट्रवादी वारसा जपणारे लोकप्रतिनिधी सदर क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करत, स्थानिक सुशासनाला नवा आयाम प्राप्त करून देतील, असा दृढ विश्वास तटकरेंनी स्टार प्रचारकांच्या यादी जाहीर करताना व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com