MIM News: शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव अन् 'एमआयएम'चा बायकाॅट! महापालिकेची पहिलीच सभा ठरली वादळी

Chhatrapati Sambhajinagar Politics: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक आधीच सभागृहाबाहेर भाजपाचा निषेध नोंदवून निघून गेले होते. तर विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमनेही सभात्याग केला. त्यामुळे सत्ताधारी पक्षाने सभागृहाचे काम पुढे रेटून नेले.
imtiaz jaleel Chhatrapati Sambhajinagar
imtiaz jaleel Chhatrapati SambhajinagarSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : महापालिकेवर बहुमतासह सत्ता मिळवल्यानंतर झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजप-शिवसेनेला विरोधकांच्या विरोधाला सामारे जावे लागले. शहराच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी आणि निधी देणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव नाकारल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक आक्रमक झाले.

तर भाजपाच्या वतीने आणण्यात आलेल्या छत्रपती संभाजीनगर नामकरणाबद्दल सरकारचे अभिनंदन करण्याच्या ठरावाचा निषेध करत एमआयएमच्या नगरसेवकांनी बायकाॅट केला. महापौर समीर राजूरकर यांनी विरोधकांना न जुमानता आक्रमक भूमिका घेतली. ठाकरेच्या पक्षाच्या सहा नगरसेवकांना सभागृहाबाहेर काढले, तर एमआयएमच्या बायकाॅटलाही फार महत्व दिले नाही.

गेली वीस-पंचवीस वर्ष औरंगाबाद की संभाजीनगर? या नावावरून सत्ताधारी आणि विरोधकांचे राजकारण सुरू होते. सत्ताधारी शिवसेना-भाजपाने सातत्याने संभाजीनगरचा आग्रह धरला, तर त्याला विरोध करत एमआयएमने आपली वोट बँक मजबूत केली. परंतु वर्षभरापुर्वी हा विषयच राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान देवेंद्र फडणवीस यांनी निकाली काढला. छत्रपती संभाजीनगर हे नाव आता अधिकृत झाले आहे.

एमआयएमच्या नगरसेवकांना मात्र अजूनही हा निर्णय पचनी पडलेला नाही. भाजपाचे स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी विकास निधी पाहिजे असेल तर निधी मागणी पत्रावर छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख असलाच पाहिजे, असा आग्रह काल धरला. यावर विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजेद बिल्डर यांनी सांमजस्याची भूमिका घेत एकमेकांचा आदर करू, आम्ही छत्रपती संभाजीनगरसह औरंगाबाद असाही उल्लेख करू, अशी भूमिका काल घेतली.

imtiaz jaleel Chhatrapati Sambhajinagar
IAS Officer News: एकेकाळी अजितदादांच्या 'गुडबुक'मध्ये राहिलेल्या 'आयएएस' अधिकाऱ्याची अचानक स्वेच्छानिवृत्ती, सरकारने आदेशही काढले

आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मात्र एमआयएमचा छत्रपती संभाजीनगर शहराच्या नामकरणाच्या अभिनंदन प्रस्तावावर आक्रमक पावित्रा दिसून आला. भाजपाचे नगरसेवक महेश माळवदकर हे या अभिनंदन ठरावावर बोलत असतानाच एमआयएमच्या नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकला. त्याचे सर्व नगरसेवक सभागृह सोडून बाहेर निघून गेले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक आधीच सभागृहाबाहेर भाजपाचा निषेध नोंदवून निघून गेले होते. तर विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमनेही सभात्याग केला. त्यामुळे सत्ताधारी पक्षाने सभागृहाचे काम पुढे रेटून नेले. एकूणच महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा गोंधळातच झाली. सर्वसामन्यांच्या प्रश्नावर चर्चे होणे अपेक्षित असताना इथे अभिनंदनाचे ठराव, श्रेयवाद आणि नामकरणाचे राजकारण हेच झाल्याचे दिसून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com