Shivsena News: अंबादास दानवेंचा शिवसेनेत 'करेक्ट कार्यक्रम' होणार? 'या' कट्टर विरोधक नेत्याच्या हालचाली वाढल्या, थेट ठाकरेंची भेट घेणार

Chhatrapati Sambhajinagar Political News: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तीन सदस्य फोडल्याचा आरोप आहे. शिंदेंच्या शिवसेनेसोबत जात जिल्हा परिषदेत सत्ता मिळवण्याचा प्रयत्न फसला. अंबादास दानवे यांनी स्वतः आमच्या काही सदस्यांची सत्तेत जाण्याची इच्छा असल्याचे जाहीरपणे सांगितले होते.
Chandrakant Khaire, Uddhav Thackeray News
Chandrakant Khaire, Uddhav Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सहा नगरसवेक निवडून आले, जिल्हा परिषदेत ही संख्या 9 वर गेली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या नेत्यांवर जबाबदारी सोपवली होती त्यांनी काय केले? आपल्या पक्षाच्या सदस्यांनी त्यांच्यावर 18 कोटी घेतल्याचा आरोप केला आहे. शहर आणि जिल्ह्यातील आपल्याच पक्षातील काही नेत्यांनी शिवसेना संपवली आहे, असा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला.

मी स्वत: मुंबईला जाऊन उद्धव ठाकरेंना हात जोडून विनंती करणार आहे, साहेब आता तरी या नेत्यांवर कारवाई करा. माझ्या संपूर्ण राजकीय आयुष्यात कधी माझ्यावर एक लाख रुपयाच्या घोटाळ्याचा आरोप नाही. इथे तर आपल्याच सदस्यांनी एका नेत्यावर 18 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. या नेत्याने शिवसेना संपवली आहे. उद्धवसाहेबांनी आतातरी लक्ष घालावे, असे मी त्यांना सांगणार आहे, असे सांगत चंद्रकांत खैरे यांनी अप्रत्यक्षरित्या अंबादास दानवे यांच्यावर निशाणा साधला.

मी कोणाचेही नाव घेणार नाही, शिवसेना कोणी संपवली, कोणावर 18 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे, हे सगळ्यांना माहित आहे, मी नाव कशाला घेऊ? असे म्हणत खैरे यांनी आपण मुंबईला जाऊन या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले. पक्षाने आपल्यावर लातूर, धाराशीव, सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी दिली होती. आपण तिकडे काम करत होतो, शहराची जबाबदारी दुसऱ्या नेत्यावर होती, असेही खैरे म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तीन सदस्य फोडल्याचा आरोप आहे. शिंदेंच्या शिवसेनेसोबत जात जिल्हा परिषदेत सत्ता मिळवण्याचा प्रयत्न फसला. अंबादास दानवे यांनी स्वतः आमच्या काही सदस्यांची सत्तेत जाण्याची इच्छा असल्याचे जाहीरपणे सांगितले होते.

Chandrakant Khaire, Uddhav Thackeray News
Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवरही गुन्हा दाखल होणार? सुषमा अंधारे अन् रुपाली पाटलांनी एकत्र येत लावली ताकद

सहलीवर गेलेल्या काही सदस्यांपैकी दोघे भाजपाच्या गळाला लागले. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे झेडपी सदस्य संजय निकम यांनी पत्रकार परिषद घेत अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दानवे यांनी आम्हाला डांबून ठेवले, आमचा परस्पर सौदा केला, असा आरोप निकम यांनी केला होता. याचाच आधार घेत चंद्रकांत खैरे यांनी नाव न घेता अंबादास दानवे यांना लक्ष्य केले.

राज्यसभेच्या निवडणुकीवेळी आपण इच्छुक होतो, तशी इच्छा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली होती, अशी कबुलीही खैरे यांनी दिली. प्रियंका चतुर्वेदी यांचे नाव पुन्हा चर्चेत होते, मागच्यावेळी मी इच्छुक असताना साहेबांनी प्रियंका चतुर्वेदी यांना संधी दिली होती. आता पुन्हा त्यांचेच नाव समोर आल्याने मी राज्यसभेवर संधी मिळावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com