Municipal Corporation News : महापालिकेसाठी नव्याने होणार प्रभाग रचना; निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रतीक्षा!

The Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation is set for a new ward structure, pending the Election Commission’s approval. : 2022 मध्ये राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार 126 वॉर्डांसाठी 42 प्रभागांची रचना करण्यात आली होती. एका प्रभागात तीन वॉर्डांचा समावेश करण्यात आला होता.
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर शहरातील महापालिका निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. महापालिका प्रशासनाला मात्र निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. 2022 मध्ये महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिकेने 42 प्रभागांची तयारी केली होती. राज्य निवडणूक आयोगाकडून नवे आदेश आले तर नव्याने प्रभाग रचना करावी लागणार आहे.

महापालिकेच्या (Municipal Corporation) निवडणुका पाच वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडल्या आहेत. ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका सुरू होती. त्यात मंगळवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासन व निवडणूक आयोगाला दिले आहेत. निवडणुकीची अधिसूचना चार आठवड्यात काढण्याचे आदेश देखील सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

2022 मध्ये राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार 126 वॉर्डांसाठी 42 प्रभागांची रचना करण्यात आली होती. (Chhatrapati Sambhajinagar) एका प्रभागात तीन वॉर्डांचा समावेश करण्यात आला होता. महापालिकेच्या क्षेत्रात 115 वॉर्ड होते, वाढती लोकसंख्या लक्षात घेत अकरा वॉर्ड वाढवण्यात आले. त्यामुळे वॉर्डांची संख्या 126 झाली. या वार्डासाठी 42 प्रभाग करण्यात आले. सध्या 42 प्रभागांची रचना अस्तित्वात आहे.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News
Municipal Corporation News : महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा; महायुती स्ट्राॅंग, पण उद्धवसेनाही धक्का देण्याच्या तयारीत!

आठवडाभरात होणार चित्र स्पष्ट

सर्वोच्च न्यायालयाच्या मंगळवारच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोग निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करेल. येत्या दोन-तीन दिवसांत निवडणुकीबद्दलच्या मार्गदर्शक सूचना महापालिकेला पाठवल्या जातील. त्यानंतर निवडणुकीबद्दलची नेमकी भूमिका स्पष्ट होऊ शकणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : विधानसभेला जागा वाढताच भाजपकडून स्वबळाचा नारा!

'सिंगल वॉर्ड'नुसार किंवा तीन वॉर्डांचा एक प्रभाग यानुसार निवडणूक घेण्याचे निर्देश आले, तर महापालिकेला विशेष तयारी करावी लागणार नाही. चार वॉर्डांचा एक प्रभाग करण्याबद्दल मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यास वॉर्ड रचना आणि प्रभाग रचना नव्याने करावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com