Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरात शिंदे सेनेचे आस्ते कदम.. महायुतीतील अंतर्गत नाराजीमुळे थेट अर्जच दाखल करणार...

Lok Sabha Constituency : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. एकूणच शिवसेनेने संभाजीनगरचा उमेदवार जाहीर करताना 'आस्ते कदम'ची भूमिका स्वीकारल्याचे दिसते.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : राज्याच्या सत्तेत फ्रंट फूटवर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात मात्र बॅकफूटला गेली आहे. आतापर्यंत 13 जागांवर शिवसेनेला आपले उमेदवार निश्चित करता आले आहेत. पैकी हिंगोली, वाशीम-यवतमाळ या लोकसभा मतदारसंघातून चक्क विद्यमान खासदारांना दिलेली उमेदवारी पुन्हा बदलण्याची नामुष्की मुख्यमंत्र्यांवर ओढावली.

तर नाशिक, पालघर, संभाजीनगर या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली तरी अद्याप उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली नाही. छत्रपती संभाजीनगर लोकसभेचा विचार केला तर इथे महाविकास आघाडी, एमआयएम, वंचित, अपक्ष अशा सगळ्यांनी जोरदार तयारी केलेली असताना शिवसेनेच्या संदीपान भुमरे यांच्या नावाची फक्त चर्चाच सुरू आहे. आज होणार, उद्या होणार असे करत अनेक मुहूर्त जे शिवसेनेकडूनच जाहीर करण्यात आले होते ते टळले आणि या पक्षाचे हसे होऊन बसले.

आता जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे Sandipan Bhumare यांचे नाव अंतिम झाल्याचे सांगितले जात असून, ते येत्या 25 एप्रिल रोजी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shidne यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. एकूणच शिवसेनेने संभाजीनगरचा Chhatrapati Sambhajinagar उमेदवार जाहीर करताना 'आस्ते कदम'ची भूमिका स्वीकारल्याचे दिसते.

Eknath Shinde
Satara Lok Sabha Election 2024 : उदयनराजेंच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदींची सभा; ठिकाण अन् तारीखही ठरली

संदीपान भुमरे यांना पक्षांतर्गत विरोध फारसा नसला तरी भाजपने गेल्या तीन वर्षांपासून या मतदारसंघात केलेली तयारी, मतदारांशी वाढवलेला संपर्क, बूथ स्तरापर्यंतची बांधणी यासह सर्वच गोष्टींवर पाणी फिरणार आहे. भाजपचे BJP नेते महायुतीच्या प्रचार कार्यालयात सहभागी होऊन, भाषणं करीत असले तरी त्यांच्या जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.

या अस्वस्थतेचा स्फोट होण्यापूर्वी छोट्या-मोठ्या कुरबुरींना सुरवातही झाली आहे. भाजपच्या काही माजी नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकवायला सुरुवात केली आहे. राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी याबाबी गांभीर्याने घेतल्या नाहीत किंवा त्याकडे डोळेझाक केली तर संभाजीनगरात महायुतीला म्हणण्यापेक्षा शिवसेनेच्या उमेदवाराला दगाफटका होऊ शकतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीत शिवसेना शिंदे Shivsena गटाला संभाजीनगरची जागा सोडण्यात आल्याने भाजपला इथल्या निवडणुकीत फारसा रस उरलेला नाही. त्यामुळे भाजपचे नेते प्रचारात, सभांमध्ये दिसले तरी ते मनाने भुमरे यांच्यासोबत असतील की नाही? याबद्दल मात्र शंका व्यक्त केली जात आहे. नेमकं हेच कारण संदीपान भुमरे यांचे नाव अधिकृतपणे घोषित न करण्यामागे असल्याचे बोलले जाते.

Eknath Shinde
Maharashtra Politics : वय झाले, इच्छाशक्ती कायम..! दोन नेत्यांनी फोडलाय शक्तिशाली सत्ताधाऱ्यांना घाम

मराठा म्हणूनच उमेदवारी ?

संदीपान भुमरे यांचा राजकीय अनुभव मोठा आहे. पैठण या जालना लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघातून ते पाच वेळा निवडून आलेले आहेत. शिवाय मतदारसंघातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भुमरे यांचे एकहाती वर्चस्व आहे. पण हे सगळं त्यांच्या पैठणमध्ये. संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर आता राज्याचे रोहयो व जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनच त्यांचा संबंध येत आहे. अन्यथा ते फक्त शिवसेनेचे मुंबईतले नेते संभाजीनगरात आले की पैठणमधून यायचे.

शिवसेना फुटीपूर्वीचे हे चित्र आता बदलले असले तरी त्यांचा संपर्क हा संभाजीनगर जिल्ह्यापेक्षा पैठण मतदारसंघातून अधिक आहे. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा विचार करतांना केवळ मराठा म्हणून भुमरे यांना उमेदवारी देण्यात आल्याचे दिसून येते. मराठा आरक्षणासाठी राज्यात आतापर्यंत मोर्चे, आंदोलने झाली, पण सर्वाधिक चर्चा आणि सहभाग भुमरेंचा होता तो मनोज जरांगे पाटील Manoj JarangePatil यांच्या अंतरवाली सराटीतील आंदोलनात.

सरकारचे प्रतिनिधी म्हणून भुमरे आंदोलनाच्या सुरुवातीपासून मनोज पाटील जरांगेच्या संपर्कात आहेत. या दोघांमध्ये चांगला संवाद असल्याचेही अनेकदा दिसून आले आहे. मनोज जरांगे पाटील भुमरे यांचा मामा असा नेहमी उल्लेख करतात. त्यामुळे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात संदीपान भुमरे उमेदवार असले तर त्यांच्याबद्दल मनोज जरांगे पाटील मवाळ भूमिका घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

R

Eknath Shinde
Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीबाबतचा अजितदादांचा दावा पवारांनी फेटाळला; भाजपसोबत जाण्याची इच्छा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com