Shivsena UBT News : शिवसेना-भाजपा दोघांकडून उद्धव ठाकरेंच्या पक्षाला धक्का! आता युवा सेनेलाही गळती..

Uddhav Thackeray’s Yuva Sena suffers a blow in Chhatrapati Sambhajinagar as several young leaders switch sides and join the BJP. : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहर प्रमुख तथा युवा सेनेचे चिटणीस मिथुन व्यास हे भाजपाच्या गळाला लागले आहेत.
Shivsena UBT News Marathwada
Shivsena UBT News MarathwadaSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्के देणे सुरूच आहे. माजी महापौरांनी शिवसेनेची वाट धरल्यानंतर आता युवा सेनेलाही गळती सुरू झाली आहे. युवासेनेचे चिटणीस आणि शिवसेनेचे उपशहरप्रमुख मिथुन व्यास यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांसह भाजपात जाण्याचा निर्णय घेतला.

भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होत आहे. गेल्याच आठवड्यात माजी महापौर तथा सहसंपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जय महाराष्ट्र केला होता. शिवसेनेत प्रवेश करणारे ते सातवे माजी महापौर ठरले होते. हा प्रवेश होऊन काही दिवस उलटत नाही तोच आता भाजपाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तरूण, तडफदार कार्यकर्त्यांवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे (Shivsena) उपशहर प्रमुख तथा युवा सेनेचे चिटणीस मिथुन व्यास हे भाजपाच्या गळाला लागले आहेत. आपल्या आठ ते दहा समर्थकांसह ते आज भाजापचे कमळ हाती घेणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर लागलेली ही गळती थांबवण्याचा प्रयत्न ना स्थानिक नेते करत आहेत, ना राज्य पातळीवरचे. उलट ज्यांना जायचे, त्यांना जाऊ द्या, अशीच भूमिका वरिष्ठ नेत्यांची असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे.

Shivsena UBT News Marathwada
Shivsena News : माजी महापौरानंतर आता माजी आमदाराचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र!

वर्षानुवर्ष पक्षात राहून निवडणुका हाताळणारे नेते, रस्त्यावर उतरून झटणारे तरूण कार्यकर्ते पक्ष सोडून जात असल्याने याचा फटका उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला निश्चितच होणार आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच सर्वाधिक गळती लागल्याचे चित्र आहे. त्यातुलनेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात फारशा घडामोडी घडताना दिसत नाहीयेत.

Shivsena UBT News Marathwada
Chhatrapati Sambhajinagar : आमदार म्हणतात, विकासकामांनी मतदारसंघाची ओळख निर्माण करू..

या कार्यकर्त्यांचा होणार प्रवेश..

उपशहर प्रमुख युवासेना चिटणीस मिथुन व्यास, उपशहर प्रमुख युवा सेना विष्णू क्षीरसागर, उपशहर प्रमुख संजय महागुडे, उपशहर प्रमुख युवासेना योगेश जोशी, उपशहरप्रमुख युवासेना शैलेश सुरडकर, विभाग प्रमुख गुलमंडी आकाश झुंजरकर, शाखाप्रमुख पंकज जयस्वाल, शाखाप्रमुख प्रभात पुरवार, गटप्रमुख अभिषेक डोंगरे, गटप्रमुख अशितोष खंडेलवाल यांच्यासह रोहित अहुजा, केतन सावजी, तुषार दरक, परेश जैन, तुषार चोरडिया, सचिन बंब,निखिल, सचिन अचलिया, शुभम डेंगे, अभिषेक क्षीरसागर, गुड्डू डोंगरे, अंकित सोनी यांच्यासह पदाधिकारी पक्ष प्रवेश करणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com