Ambadas Danve : झेडपीत ठाकरेंची शिवसेना विरोधकाच्या भूमिकेतच! युतीला पाठिंबा नाहीच, अंबादास दानवेंनी स्पष्टच सांगितले

Chhatrapati Sambhajinagar ZP News : अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले की, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत ठाकरे सेना विरोधकांच्या भूमिकेतच राहील. भाजपला पाठिंबा देणार नाही, असा ठाम निर्णय त्यांनी जाहीर केला.
Ambadas Danve addressing media, announcing Shiv Sena UBT’s decision to remain in opposition in Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad.
Ambadas Danve addressing media, announcing Shiv Sena UBT’s decision to remain in opposition in Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad.Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप या दोन पक्षांना स्पष्ट बहुमत आहे. तरीही अध्यक्ष पदासह, सभापती पदाच्या वाटपावरून या दोन्ही पक्षात फाटेल आणि तिसऱ्या पर्यायाचा प्रयोग केला जाईल, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. या चर्चांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पूर्ण विराम दिला आहे. आम्ही विरोधकांच्या भूमिकेतच बसू, असे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेत 9 तर पंचायत समितीच्या निवडणुकीत 11 सदस्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवडून आले आहेत. युतीत अध्यक्षपदावरून रस्सीखेच सुरू असताना ठाकरे सेना मात्र कोणाच्याही मागे जाणार नाही, अशी भूमिका नेते अंबादास दानवे यांनी घेतली आहे. सिल्लोड वगळता सर्व तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला प्रतिनिधित्व मिळाले आहे.

नऊ सदस्य निवडून आलेले असल्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समितीमध्ये पदाधिकारी निवडताना ठाकरे सेनेची भूमिका महत्वाची ठरणार असून, आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नाही, त्यांचा पाठिंबा घेणार नाही, असे दानवे यांनी स्पष्ट केले. पक्ष सोडून कुणी वैयक्तिक पाठिंबा दिला तर तो घेतला जाईल, असेही ते म्हणाले

Ambadas Danve addressing media, announcing Shiv Sena UBT’s decision to remain in opposition in Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad.
Parbhani ZP : 'रासप'चे आमदार रत्नाकर गुट्टेंनी पडद्यामागून फिरवली सूत्र; महापालिकेत हरलेली भाजप ZP निवडणुकीत थेट सत्तेच्या उंबरठ्यावर

नोकरी सोडा, राजकारणात या..

अंबादास दानवे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्यावरही नाव न घेता ते पुतण्याला अध्यक्ष करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. त्यासाठी मुख्य अभियंता जिल्हा परिषद सदस्यांना फोन करून त्यांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना एवढेच राजकारण करायचे असेल तर शासकीय नोकरी सोडून राजकारणात यावे, असा टोला दानवे यांनी यावेळी लगावला.

Ambadas Danve addressing media, announcing Shiv Sena UBT’s decision to remain in opposition in Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad.
Sambhajinagar Politics : संभाजीनगरमध्ये महापौर, उपमहापौर खुर्चीवर विराजमान; आता भाजपच्या 150 इच्छुकांकडून 'स्वीकृत'साठी फिल्डिंग!

महापालिकेमार्फत शहराच्या विविध भागात सुरू असलेल्या पाण्याच्या टँकरची चौकशी करण्याची मागणीही दानवे यांनी केली. खासगी कंत्राटदारांच्या टँकरची RTO तपासणी करून घेतलेली नाही. अधिकारी, कर्मचारी देखील टँकरच्या कंत्राटदारांना पाठीशी घालतात, त्यामुळे याचे ऑडिट करावे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे. परंतु, राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती कर्जमाफी देण्यासारखी आहे का? शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी एवढा उशीर का लागतो? असा सवालही अंबादास दानवे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com