BJP leaders Samir Rajurkar and Rajendra Janjal assume charge as Mayor and Deputy Mayor in Chhatrapati Sambhajinagar amid rising competition for accepted member posts.
BJP leaders Samir Rajurkar and Rajendra Janjal assume charge as Mayor and Deputy Mayor in Chhatrapati Sambhajinagar amid rising competition for accepted member posts.Sarkarnama

Sambhajinagar Politics : संभाजीनगरमध्ये महापौर, उपमहापौर खुर्चीवर विराजमान; आता भाजपच्या 150 इच्छुकांकडून 'स्वीकृत'साठी फिल्डिंग!

BJP Mayor Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपचा महापौर विराजमान झाल्यानंतर स्वीकृत सदस्यांच्या पाच जागांसाठी तब्बल 150 इच्छुकांची स्पर्धा रंगली असून पक्षात मोठी चुरस निर्माण झाली आहे.
Published on

Chhatrapati Sambhajinagar News : तीन दशकानंतर पहिल्यांदाच भाजपाने स्वबळावर छत्रपती संभाजीनगर महापालिकेत आपला महापौर बसवला. तर बहुमतापासून केवळ एका मताने दूर असलेल्या भाजपाने मित्रपक्ष शिवसेनेला सोबत घेत युती धर्मही पाळला. महापौर पद भाजपला तर उपमहापौर पदी शिवसेनेला संधी देण्यात आली. समीर राजूरकर, राजेंद्र जंजाळ हे अनुक्रमे महापौर, उपमहापौर पदावर विराजमानही झाले आहेत.

आता महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या, बंडखोरी टाळण्यासाठी नेत्यांनी उमेदवारांच्या घरोघरी जाऊन दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्याची वेळ आली आहे. अर्थात भाजपाच्या वाट्याला येणाऱ्या पाच स्वीकृत सदस्य पदावर तब्बल दीडशे इच्छुक आणि दावेदार पक्षात तयार झाले आहेत. या इच्छुकांनी आता स्वीकृत सदस्य म्हणून आपली वर्णी लागावी यासाठी फिल्डिंग लावायला सुरूवात केली आहे.

महानगर पालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला त्याआधीपासून भाजपमध्ये मोठे नाराजी नाट्य घडले होते. निवडणूक प्रचार कार्यालयात उपोषण, अंगावर धावून जाणे, मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, आमदार संजय केणेकर यांना घेराव घालत जाब विचारण्यात आला होता. तर काही इच्छुकांनी टोकाची भूमिका घेत अक्षरशः आत्मदहनाचा प्रयत्नही केला होता. या सगळ्या परिस्थितीवर मात करत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी महापालिकेत स्वबळावर कमळ फुलवले.

BJP leaders Samir Rajurkar and Rajendra Janjal assume charge as Mayor and Deputy Mayor in Chhatrapati Sambhajinagar amid rising competition for accepted member posts.
Parbhani ZP : 'रासप'चे आमदार रत्नाकर गुट्टेंनी पडद्यामागून फिरवली सूत्र; महापालिकेत हरलेली भाजप ZP निवडणुकीत थेट सत्तेच्या उंबरठ्यावर

पण या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी सावे, कराड, केनेकर या नेत्यांना चांगलाच घाम गाळावा लागला होता. यातील अनेकांना स्वीकृत सदस्य करण्याचा शब्दही या नेते मंडळीने तेव्हा दिल्याचे बोलले जाते. आता जागा पाच आणि इच्छुक दीडशे अशी परिस्थिती झाल्याने नेत्यांची डोकेदुखी पुन्हा वाढणार आहे. महापालिकेतील स्वीकृत सदस्यपदासाठी भाजपमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे.

BJP leaders Samir Rajurkar and Rajendra Janjal assume charge as Mayor and Deputy Mayor in Chhatrapati Sambhajinagar amid rising competition for accepted member posts.
Sambhajinagar ZP Result : पैशांच्या तिजोऱ्या अन् मंत्र्यांच्या फौजेला निष्ठेचे उत्तर! झेडपीत 9 जागा जिंकल्यानंतर अंबादास दानवेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा!

5 जागांसाठी तब्बल 150 इच्छुकांनी अर्ज केल्याने पक्ष कार्यालयाबाहेर गर्दी वाढली आहे. स्वीकृत सदस्य होण्यासाठी स्वयंसेवी संस्थेचे सदस्य असण्याची अट पूर्ण करण्यासाठी धर्मादाय कार्यालयात ‘चेंज रिपोर्ट’चा महापूर आला आहे. महापालिकेत 115 नगरसेवक असल्याने 11.5 मताधिक्य आवश्यक आहे. भाजपला 5, एआयएमआयएमला 3, शिंदेसेनेला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित जागेसाठी इतर पक्षांत घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com