CM Shinde On Abhimanyu Pawar: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीकडूनही पवार यांच्या उपक्रमाचे कौतुक..

Eknath Shinde News: सगळं मंत्रीमंडळ इकडे आलंय. विरोधी पक्षनेतेही आलेत आणि संपूर्ण महाविकास आघाडीही आलीय.
Cm Shinde On Abhimanyu Pawar, News
Cm Shinde On Abhimanyu Pawar, NewsSarkarnama
Published on
Updated on

Latur News : आमदार अभिमन्यू पवार (Mla Abhimanyu Pawar) यांनी आपल्या मुलाचा विवाह एकट्यानेच थाटामाटात न करता हाच थाटमाट आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील, अनाथ व विरमरण आलेल्या सैनिकांच्या मुलांमुलींच्या जीवनात आणला. पंचवीस मुलींचे कन्यादान करुन त्यांनी महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींपुढे एक आदर्श ठेवला आहे. जर लोकप्रतिनिधींनी आपल्या सुखात गरीब व अनाथ कुटुंबांना सामावून घेतले तर अनाथ व कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबाला मुलीच्या लग्नाची चिंताच राहणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी औशाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांचे कौतुक केले.

Cm Shinde On Abhimanyu Pawar, News
Nanded Bjp District president News : भाजप भाकरी फिरवणार ? की चिखलीकर सांगतील तोच जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष ...

अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांच्या मुलासह पंचविस मुलांमुलींच्या सामुदायीक विवाह सोहळ्यात बुधवारी मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadanvis) विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह मंत्रीमंडळातील अनेक मंत्री, खासदार, आमदार, प्रशासकीय सेवेतील अधिकारी व नागरीक यावेळी उपस्थित होते. या विवाह सोहळ्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते.

सगळं मंत्रीमंडळ इकडे आलंय. विरोधी पक्षनेतेही आलेत आणि संपूर्ण महाविकास आघाडीही आलीय. (Eknath Shinde) यावरुनच अभिमन्यूची लोकप्रियता आणि त्यांचे राजकारणा व्यतिरिक्त असलेले संबंध दिसुन येतात. अभिमन्यू जेवढा मोठा नेता आहे, त्यापेक्षा त्याने कार्यकर्ता मोठा ठेवला, असे गौरवोद्दगार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. अभिमन्यू पवार हे केवळ परिक्षीत पवारांचे पिता होऊन मुलाचे लग्न थाटामाटात करण्यापेक्षा या पंचविस नवदांपत्याच्या पालकांच्या भुमिकेत दिसले.

कुठलाही भेदभाव न ठेवता त्यांनी सर्वांना समान वागणुक दिली. लोकप्रतिनिधींनी सर्वांच्या दु:खात स्व:ता जायचे असते व आनंदात सर्वांना सामावुन घ्यायचे असते. तोच पायंडा अभिमन्यू यांनी पाडला, याचा मला त्यांच्या कुटुंबाचा एक भाग म्हणुन अभिमान आणि आनंद वाटतो. तो किती मोठा नेता झाला यापेक्षा त्यांने स्व:तातील कार्यकर्ता मोठा ठेवला ही त्याची खास बाब असल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पवार यांचे तोंडभरून कौतुक केले.

आमादर अभिमन्यू पवारांनी गरीब व आर्थीक हालाखीच्या कुटुंबातील मुलांमुलींची लग्ने आपल्या मुलाच्या लग्नात लाऊन दिली. हा चांगाला पायंडा असुन त्यांचा हा आदर्श महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधींनी व श्रीमंत लोकांनी घेण्यासारखा आहे. त्यांच्या या कार्याला सर्व महाविकास आघाडी तर्फे शुभेच्छा असल्याचे अजित पवार मिश्किलपणे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com