
Jan Akrosh Morcha: सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील सर्व आरोपी पकडले जातील, त्यांना शिक्षा होईल. कोणी कितीही मोठा असला, तो कोणत्याही नेत्याचा जवळचा किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचा असला तरी त्याला सोडणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्याप्रमाणे खून प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई, एसआयटी, सीआयडी आणि आता न्यायालयीन चौकशी सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला म्हणून आम्ही शांत आहोत, यातील एकही आरोपी सुटला तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी आहे, असा इशारा मराठ आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला. सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चा मनोज जरांगे पाटील सहभागी झाले होते.
यावेळी त्यांनी खून प्रकरणातील आरोपी सुटतील असे आम्हाला वाटत नाही. (Devendra Fadanvis) मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे, त्यावर लोकांनी विश्वास ठेवला आहे. सगळ्या आरोपींना शिक्षा होईल याची जबाबदारी आता त्यांची आहे. एकही आरोपी यातून सुटला तर आम्ही राज्य बंद पाडू, अशा इशारा जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणात दिला. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी मी आणि माझा समाज भक्कमपणे उभे राहणार आहोत.
परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबीयाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांच्याही पाठीशी ठामपणे उभे राहू. देशमुख हत्या प्रकरणात खंडणी, खून,डाके टाकणारे, बलात्कार,छेडछाड करणारे आणि या सगळ्यांना लपवणारे अशी मोठी टीम आणि नेटवर्क आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनाचा सामुहिक कट रचनारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असल्याचे जरांगे म्हणाले.
खंडणी आणि खून करणाऱ्यांना सांभाळले कुणी? हे पोलिसांच्या चार्जशीटमध्ये आलंच पाहिजे. ज्या दिवशी आरोपी सुटतील असे आम्हाला वाटेल त्या दिवशी राज्य बंद करू. समोरचा डाव टाकतो ते ओळखायला शिका. देशमुख कुटुंबावर आलेली वेळ ही राज्यात कोणावरही येऊ नये. आज देशमुख कुटुंबावर वनवास आला आहे. हे पुढील काळात होऊ द्यायचे नसेल, तर तर धनंजय मुंडेंच्या टोळ्या संपवा, या लोकाना धनंजय मुंडेंची मूक संमती असल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.