
Supect Sudarshan Ghule News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात नवी अपडेट आली आहे. काल (ता.३१) वाल्मिक कराडने स्वतः सीआयडीसमोर शरणागती पत्करल्यानंतर आता तपासाला गती आल्याचे दिसत आहे. सीआयडीने आपला मोर्चा हत्येतील मुख्य संशयीत आरोपी सुदर्शन घुलेच्या घराकडे वळवला असून घरच्यांसह नातेवाईंकांची कसून चौकशी केली जात आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात एकच संतापाची लाट उसळली आहे. आजही (ता.१) हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मस्साजोग ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले. दरम्यान २१ दिवस उलटल्यानंतरही पोलिसांना आणि सीआयडीला हत्येतील आरोपींना जेरबंद करण्यात अपशय आले होते. पण वाल्मिक कराडने स्वतः काल सीआयडीसमोर शरणागती पत्करली. यावरून पुन्हा एकदा विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष करत टीकेची झोढ उडवली.
आता मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या ठावठिकाण्याचा शोध घेण्यासाठी सीआयडीकडून तपासाची चक्रे फिरवली जात आहेत. तर मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या मुसक्या आवळण्यासाठी सीआयडीचे पथक आज सकाळीच गावात पोहोचली आहे. केज तालुक्यातील टाकळी गावात सीआयडीची टीमने तळ ठोकला असून घुलेच्या घरच्यांसह नातेवाईंची चौकशी सुरू केली आहे.
सीआयडीच्या अधिकाऱ्यांरी घुले याच्या घरच्यांची आणि नातेवाईकांशी कसून चौकशी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येतील तिन्ही फरार आरोपी नातेवकांच्या संपर्कात आहेत का याचाही शोध सीआयडीकडून घेण्यात येत आहे. सध्या सीआयडीकडून तिन्ही फरार आरोपींच्या शोधासाठी सर्व प्रयत्न केले जात असून पथके तयार करण्यात आली आहेत.
सुदर्शन घुले आहे तरी कुठे?
संतोष देशमुख हत्याप्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन घुले आहे. तर यात कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे असे दोन साथीदार आहेत. सध्या हे तिघे ही फरार असून गेल्या २२ दिवसापासून सीआयडी त्यांचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप सुदर्शन घुलेचा सोक्षमोक्ष लागलेला नाही. सुदर्शन घुले मिळाल्यास या प्रकरणाची पाळेमुळे उघड होणार असून त्याने कोणच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांची हत्या केली? मारहाण करताना त्याने कोणाला व्हिडिओ कॉल केला? या प्रकरणीतील आका कोण? अशा प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. यामुळे सीआयडी त्याच्या मागावर आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.