VIDEO : वडीगोद्री येथे ओबीसी आणि मराठा समाजाचे कार्यकर्ते आमने-सामने, एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी अन्...

Manoj Jarange Patil Vs Laxman Hake : आंतरवाली येथे जरांगे-पाटील यांचं उपोषण सुरू आहे. दुसरीकडे वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके हेही उपोषणलाा बसले आहेत. त्यातच मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने-सामने आल्याची घटना घडली आहे.
obc vs maratha worker clash
obc vs maratha worker clashsarkarnama
Published on
Updated on

जालन्यातील वडीगोद्री येथे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. वडीगोद्री मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. दोन्ही समाजाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे कार्यकर्त्यांना शांत करताना पोलिसांनी दमछाक उडाली.

हैदराबाद गॅझेट लागू करावे, सगेसोयरे संदर्भात तत्काळ निर्णय घ्यावा, आदी मागण्यासाठी मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरू केले आहे. दुसरीकडे ओबीसी आरक्षण अबाधित राहावे, यासाठी अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आणि सहकाऱ्यांनी बेमुदत उपोषणाला गुरूवारपासून सुरूवात केली.

obc vs maratha worker clash
OBC Leader Laxman Hake News : मनोज जरांगेंची लायकी बिग बाॅसमध्ये जाण्याची, मुख्यमंत्र्यांना कायदा कळतो का ?

अंतरवाली जाताना मध्येच वडीगोद्री लागते. तिथेच रस्त्याच्या कडेला लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे. त्यामुळे वडीगोद्रीतून मराठा समाजातील कार्यकर्त्यांच्या गाड्या जातात. तेव्हा, ओबीसी आणि मराठा कार्यकर्ते आमने-सामने आल्याच्या घडना घडत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस फाटा तैनात करण्यात आला आहे.

obc vs maratha worker clash
Eknath Shinde : जरांगेंकडून गॅझेटची मागणी तर, ओबीसी नेत्याचा 'हा' सवाल; CM शिंदे कसा मार्ग काढणार?

मात्र, शनिवारी दुपारच्या सुमारास पुन्हा ओबीसी आणि मराठा कार्यकर्ते समोरा-समोर आले. यावेळी दोन्ही कार्यकर्त्यांनी एकमेकांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी दोन्ही समाजाच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, पोलिसांची मोठी दमछाक उडाल्याचं पाहायला मिळालं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com