Marathwada Political News : देश आणि राज्य पातळीवर काॅंग्रेसने देश जोडो अभियान हाती घेतले आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काॅंग्रेसने संघटनात्मक बांधणी नव्याने सुरू केली आहे. (Congress Politics News) पण अंतर्गत गटबाजीचे लागलेले ग्रहण काही केल्या काॅंग्रेसची पाठ सोडताना दिसत नाही.
हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील पक्षवाढीच्या आढावा बैठकीतच याची प्रचिती आली. आधी अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतच राडा झाला होता. त्यानंतर आता पुन्हा काॅंग्रेस जिल्हा प्रभारी आणि निरीक्षकांसमोरच दोन गट भिडले. (Congress) त्यामुळे नेत्यांच्या देश आणि काॅंग्रेस जोडो अभियानाला हिंगोलीत तरी गालबोट लागल्याचे दिसते. काँग्रेस पक्षाचे हिंगोली जिल्ह्याचे प्रभारी तथा निरीक्षक यांच्या उपस्थितीत शनिवारी पक्षवाढीसाठी झालेल्या बैठकीतच राडा झाला.
अंतर्गत गटबाजीतून दोघांमध्ये चक्क हाणामारी झाल्याने बैठकीला आखाड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. (Marathwada) पक्षवाढीसाठीच्या बैठकीतच गटबाजी आणि हाणामारीचा प्रकार घडल्याने सामान्य कॉंग्रेस कार्यकर्ते मात्र कमालीचे नाराज झाले. शनिवारी काँग्रेस पक्षाच्या वतीने हिंगोलीत जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस जिल्ह्याचे प्रभारी सचिन नाईक व निरीक्षक सत्संग मुंढे व जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई उपस्थित होते. जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्व आघाड्यांचे पदाधिकारी तसेच माजी जिल्हा परिषद व नगर परिषद सदस्यांना बोलाविण्याची सूचना निरीक्षकांनी केली होती. परंतु बैठकीस जिल्हा कार्यकारिणीच्या २४ सदस्यांपैकी केवळ तीन सदस्य उपस्थित होते. शिवाय जिल्हा परिषद व नगरपालिकेचे पदाधिकारी मोजकेच हजर होते.
एकूण जिल्हास्तरीय बैठकीला अत्यंत कमी सदस्य हजर असल्याने प्रभारी व निरीक्षकांनी नाराजी व्यक्त करून संख्या कमी का आहे? असा प्रश्न उपस्थित केला. यावरून विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष शेख जुबेर यांनी पक्षाच्या कार्यक्रमांना मोजके कार्यकर्ते व पदाधिकारी वगळता इतरांना बोलावण्यात येत नाही, नेत्यांच्या गटबाजीमुळे एकमेकांच्या कार्यकर्त्यांना हीन वागणूक दिली जाते, असा आरोप केला.
तसेच मागील दोन महिन्यांत जिल्ह्यात संघटनात्मक काहीच काम झाले नसल्याचे निरीक्षकांसमोर सांगितले. यामुळे अनेकांनी हा प्रश्न उचलून धरला. यावरून एका अन्य नेत्याच्या समर्थकाने हे आरोप खोटे असल्याचे सांगत खुलासा करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बैठकीत वाद सुरू झाला आणि वादाचे रूपांतर दोघांच्या हाणामारीत झाले. बैठकीस उपस्थित असलेल्या काही वरिष्ठ सदस्यांच्या मध्यस्थीने भांडण सोडविण्यात आले.
जिल्ह्यातील गटबाजीवरून नाराजी दाखवत निरीक्षकांनी हा सर्व अहवाल बैठकीत देणार असल्याचे सांगून बैठक आटोपती घेतली. यापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यक्रमादरम्यान मंचावरील बॅनर फाडण्यात आले होते. १० ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे काँग्रेस पक्षाची विभागीय आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत पुन्हा एकदा पक्षातील यादवी उफाळून येईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.