Walmik Karad Wife Statement : अंजली दमानिया, संदीप क्षीरसागर, सुरेश धस यांच्या देखील गोष्टी बाहेर काढणार...

Parli Manjili Karad MCOCA Walmik Karad SIT custody murder Beed Santosh Deshmukh : बीड संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात वाल्मिक कराड याला कोठडी सुनावल्यानंतर मंजिली कराड यांची पत्रकार परिषद.
Walmik Karad 2
Walmik Karad 2Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : वाल्मिक कराड याची पत्नी मंजिली कराड हिने परळी मध्ये पत्रकार परिषद घेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला. या तिघांच्या गोष्टी बाहेर काढणार, असा इशारा मंजिली कराड यांनी दिला.

वाल्मिक कराड याला काल 'मकोका' आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात SIT अटक करत वर्ग करून घेतल्यानंतर कराड कुटुंब आणि त्याचे समर्थक परळी मध्ये चांगलेच आक्रमक झाले आहेत. कराडची पत्नी मंजिली देखील वेगवेगळे आरोप करत आहेत. यातून त्यांनी दमानिया, क्षीरसागर आणि धस यांना इशारा दिला आहे.

मंजिली कराड म्हणाल्या, "बीड प्रशासनाने जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू केल्याने, आज आंदोलन केले नाही. परंतु वाल्मिक कराड यांना यात गुंतवण्यात आलं आहे. नुसता फोन केला म्हणून कुठे हत्येचा गुन्हा लावू शकतो का? मीडिया ट्रायल करून काही गोष्टी पेरल्या गेल्या. मी देखील अंजली दमानिया, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्या गोष्टी बाहेर काढणार".

Walmik Karad 2
Walmik Karad Custody : मोठी बातमी! वाल्मिक कराड घुले अन् चाटेच्या संपर्कात? देशमुखांना दिली होती धमकी? सात दिवसांची पोलिस कोठडी

'वाल्मिक कराड याला सात दिवसांची SIT कोठडी सुनावल्याच्या निर्णयावर मंजिली कराड म्हणाल्या, आमचा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे. परंतु न्यायव्यवस्था (Court) कोणाच्या तरी दबावाखाली दिसते आहे. असे असले तरी आमचा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे. न्याय मागण्यासाठी आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे. न्याय कोण देणार? जातीवाद करू नका. न्याय द्या', अशी मागणी त्यांनी केली.

Walmik Karad 2
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख यांची हत्या का झाली? सीआयडीने खरे कारण पहिल्यांदाच आणले समोर; कोर्टात केला 'हा' युक्तिवाद...

समाजांमध्ये वाद लावून दिला

बीडमध्ये वाल्मिक कराड यांच्या निमित्ताने मीडिया ट्रायल चालू असल्याचे सांगून मराठा आणि वंजारी समाजात वाद लावून दिला. मात्र आपण सुज्ञ नागरिक आहोत, राजकीय लोकांचं ऐकू नका. वाल्मिकर कराड यांचा निवडणुकीपुरता उपयोग करून घेतला. या काळात घरी आलेल्या सर्व राजकीय लोकांचा पुरावा समोर आणणार असल्याचे मंजिली कराड यांनी सांगितले.

मंत्री मुंडेंच्या भेटीवर भाष्य...

मंत्री धनंजय मुंडे यांना भेटल्याचा मुद्यावर मंजिली कराड यांनी ती फक्त अफवा आहे. धनंजय मुंडे मला भेटले नाहीत. परंतु वाल्मिक कराड यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत संघर्ष चालूच राहणार, असे आवर्जुन सांगितले.

'त्या' फ्लॅटमध्ये मी राहत नाही

पिंपरी चिंचवडमधील फ्लॅट महापालिकेने सील करत तो लिलावाला काढला आहे. यावर मंजिली कराड यांनी मी त्या फ्लॅटमध्ये राहत नाही. त्यामुळे कराची नोटीस तिथं चिटकवली गेल्याची मला माहिती नाही, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com