Devendra Fadnavis News : 'माझ्या फोटोचे बॅनर असले तरी काढा', मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महापालिका अॅक्शन मोडमध्ये!

Following CM Devendra Fadnavis' directive, the municipal corporation has moved into action mode against illegal hoardings : बैठकीला बहुजन समाज पार्टी, भीम शक्ती संघटना, महिला जागृती मंचच्या अशा ठराविक संघटनांनी हजेरी लावली. प्रमुख राजकीय पक्षाचा एकही पदाधिकारी या बैठकीकडे फिरकला नाही.
Political Partys  Hordings News
Political Partys Hordings NewsSarkarnama
Published on
Updated on

माधव इतबारे

Chhatrapati Sambahjinagar : शहरात बेकायदा होर्डिंगचे पेव फुटले असून, न्यायालयाने दिलेले आदेश व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर महापालिका प्रशासनाने वारंवार बेकायदा होर्डिंग लावणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबत महापालिकेने दिलेले परवानगी पाहूनच होर्डिंग छापण्यात यावेत, अन्यथा संबंधितांच्या मशिन जप्त करण्यात येतील व मालमत्तांना सील लावू असा इशारा, प्रशासकांनी दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काल छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येऊन गेले. यावेळी राजकीय पक्षाकडून लावण्यात येणारे बेकायदा होर्डिंग्ज आणि त्यामुळे शहारचे होणारे विद्रुपीकरण या संदर्भात विचारण्यात आले. सत्ताधारी, विरोधक अशा सगळ्याच राजकीय पक्षांचे हे बॅनर असतात, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, माझा फोटो असलेले बेकायदेशीर बॅनरही काढा, असे स्पष्ट आदेश फडणवीसांनी दिले होते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर महापालिका अॅक्शन मोडवर आली आहे.

महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी या संदर्भात बोलविले बैठकीला प्रमुख राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दांडी मारली. शहरातील मुख्य रस्ते, चौकांमध्ये लावल्या जाणाऱ्या भाऊ, दादांच्या होर्डिंगमुळे विद्रुपीकरण होत आहे. (Municipal Corporation) महापालिकेतर्फे वारंवार कारवाई करून बेकायदा होर्डिंग जप्त केले जातात, मात्र याला न जुमानता ही राजकीय बॅनरबाजी सर्रासपणे सुरूच आहे. एखादा मंत्री, राजकीय नेता किंवा विविध महापुरुषांच्या जयंत्यांना तर बेकायदा होर्डिंगचा महापूर येतो.

Political Partys  Hordings News
Devendra Fadnavis : देवेंद्रजी, कठीण प्रसंगी फूट पाडू इच्छिणाऱ्यांनाही कानपिचक्या द्या!

बेकायदा होर्डिंगसंदर्भात न्यायालयातर्फे वारंवार स्थानिक स्वराज्य संस्था, शासनावर ताशेरे ओढले जातात. त्यामुळे महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी आज राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. बेकायदा होर्डिंग संदर्भात न्यायालयाने आदेश दिलेले असल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी 'माझे बेकायदा होर्डिंग असतील तरी काढण्यात यावेत'असे आदेश दिले. त्यानुसार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Political Partys  Hordings News
Chhatrapati Sambhajinagar Water Issue : शहराशी जिव्हाळा नसलेल्या बाहेरच्या पालकमंत्र्यांनीही पाणी प्रश्नाकडे केले दुर्लक्ष!

एक एप्रिलपासून शहरात बेकायदा होर्डिंगच्या विरोधात मोहीम हाती घेतली जाणार आहे. रात्रीच्यावेळी ही मोहीम राबविली जाणार असून, सर्वच बेकायदा होर्डींग हटविले जाणार आहेत. पथदिवे, खांबावर यापुढे कोणी होर्डिंग लावले तर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच होर्डिंग छापण्याचा व्यवसाय करणाऱ्यांना महापालिकेची परवानगी असेल तरच होर्डिंग छापावे, अन्यथा त्यांच्या मशिन जप्त करून मालमत्तांना सील लावले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Political Partys  Hordings News
Municipal Corporation : महापालिकेतील 'प्रशासक राज'ची पाच वर्ष; विकासकामे झाली, पण गैर कारभाराचे आरोपही गाजले!

बैठकीला बहुजन समाज पार्टी, भीम शक्ती संघटना, महिला जागृती मंचच्या अशा ठराविक संघटनांनी हजेरी लावली. प्रमुख राजकीय पक्षाचा एकही पदाधिकारी या बैठकीकडे फिरकला नाही. त्यामुळे खासदार, आमदारांसह पक्षांचे शहराध्यक्ष, पदाधिकाऱ्यांना पत्र पाठवून बेकायदा होर्डिंग न लावण्याचे आवाहन केले जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com