Lok Sabha Election 2024 : लेट पण थेट! संभाजीनगरचा उमेदवार ठरणार; अर्ज दाखल करायला मुख्यमंत्री शिंदेच येणार

Chhatrapati Sambhajinagar Constituency शिवसेना ठाकरे गटाच्या एका नेत्याने निवडणूक आयोगावरच दोन हजार कोटी रुपयांचा आरोप केला होता. सगळे कसे आमच्या विरोधात आहेत, असे भासवण्याचा प्रयत्न उबाठा गटाकडून केला जात आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : महायुतीतील लोकसभेच्या जागा वाटपाचा घोळ अखेर मिटला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी (ता. 19) शिवसेनेच्या उर्वरित उमेदवारांची नावे जाहीर करणार आहेत. यात छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. गेल्या महिनाभरापासून संभाजीनगरची जागा शिवसेना लढवणार की भाजप उमेदवारी कोणाला मिळणार यावर खल सुरू होता.

दोन्ही बाजूंनी दावे केले जात होते, उमेदवारी जाहीर करण्यासाठीचे मुहुर्त सांगितले जात होते. पण ते सगळे मुहुर्त हुकले, आता उद्याचा शेवटचा मुहुर्त ठरला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः शिवसेनेच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार असल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी दिली.

संभाजीनगरच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री 23 रोजी संबधिताचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार असल्याचे शिरसाट यांनी सांगितले. आज मुख्यमंत्री सांगली आणि साताऱ्याला महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे नाशिकसह संभाजीनगरचे शिवसेनेचे उमेदवार उद्या जाहीर होतील.

काही दिवसांत मराठवड्यात अनेक नेत्यांच्या सभा होणार आहेत, यावर शिरसाट म्हणाले, तो त्यांचा अधिकार आहे. आम्ही आठ ते दहा तारखेला छत्रपती संभाजीनगर येथील सभेसाठी प्रयत्न करत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा शहरात होणारच आहे. ते कोणत्याही चक्रव्यूहात फसणारे नेते नाहीत, तसेच त्यांना कुणी अडकवूही शकणार नाही. वेळ आली तर तो चक्रव्यूह भेदण्याची ताकद शिंदे यांच्यात आहे, असेही शिरसाटांनी सांगितले.

Eknath Shinde
Nashik Lok Sabha Constituency : शांतीगिरी महाराज हट्टाला पेटले; 'मला बिनविरोध निवडून द्या!'

रत्नागिरी-सिंधदुर्ग जागेसाठी शिवसेनेचे किरण सामंत व भाजपचे राणे उत्सुक होते. किरण सामंत यांनी स्वतःहून एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती. सामंतांनी निर्णय घेतला की, महायुतीत तिढा निर्माण होऊ नये म्हणून ही जागा भाजपला दिली तरी हरकत नाही. त्यामुळे राणे यांचा फॉर्म भरायला उदय सामंत, किरण सामंत आणि दिपक केसरकर उपस्थित राहणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेना ठाकरे गटाच्या एका नेत्याने निवडणूक आयोगावरच दोन हजार कोटी रुपयांचा आरोप केला होता. सगळे कसे आमच्या विरोधात आहेत, असे भासवण्याचा प्रयत्न उबाठा गटाकडून केला जात आहे. अशिष शेलार यांनी मशालीवर लिहिलेल्या कवितेबद्दल अंबादास दानवे यांनी मशालीचा कोण तोंडात घेवून बघा, असे म्हटले होते.

यावर अंबादास दानवेंवर संजय राऊत यांची सावली पडलेली दिसते. एका जबाबदार नेत्याने खालच्या स्तरावर केलेले वक्तव्य त्यांना शोभणारे नाही. उबाठा गटाच्या लोकांचा डोक्यावर परिणाम झाला आहे. तुम्हाला ही संस्कृती दिली आहे का? तुमच्या तोंडून येणाऱ्या अशा भाषेला थारा दिला जाणार नाही, अशा शब्दात शिरसाट यांनी संताप व्यक्त केला.

(Edited by Sunil Dhumal)

Eknath Shinde
Bharat Gogawale : विधानसभेची गॅरंटी द्या नाही तरच...; भरत गोगावलेंचा थेट तटकरेंनाच इशारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com