Bharat Gogawale : विधानसभेची गॅरंटी द्या नाही तरच...; भरत गोगावलेंचा थेट तटकरेंनाच इशारा

Raigad Lok Sabha Constituency : कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे कोकणातील रायगड किंवा रत्नागिरी-सिंधुदुर्गपैकी एक तरी मतदारसंघ मिळण्यासाठी शिंदे गट प्रचंड आग्रही होता.
Bharat Gogawale
Bharat GogawaleSarkarnama

Konkan Political News : महायुतीत लोकसभेच्या काही जागांवरील उमेदवारीवरून चांगलेच रणकंदन सुरू आहे. काही जागांवर उमेदवार निश्चित झाले तरी घटक पक्षांतील नेत्यांनाही विधानसभेची गॅरंटी हवी आहे. इंदापूरमधील हर्षवर्धन पाटील, पुरंदरमधील विजय शिवतारेंनंतर रायगडमधून भरत गोगावलेंनीही युतीचे उमेदवार सुनील तटकरेंना थेट इशारा दिला आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरेंनी उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळीच गोगावलेंनी Bharat Gogawale दिलेल्या इशाऱ्याने राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, रायगडची जागा राष्ट्रवादीला दिल्याने शिवसेना शिंदे गटात नाराजी होती. मात्र, युतीच्या धर्मानुसार आता त्यांना तटकरेंना मदत करावी लागणार आहे. या मदतीच्या बदल्यात मात्र गोगावलेंनी विधानसभेची गॅरंटी हवी असल्याचे सांगितले.

रायगडमधून सुनील तटकरेंना Sunil Tatkare पुन्हा खासदार करण्याची गॅरंटी आम्ही घेतलेली आहे. आता त्यांनाही आमची विधानसभेसाठी गॅरंटी घ्यावीच लागणार आहे. आम्हीही रायगडचे मावळे आहोत. त्यामुळे त्यांनी विधानसभेला आमची गॅरंटी घेतली नाही तर त्यांना दाखवून देऊ, असा थेट इशाराच गोगावलेंनी तटकरेंना दिला आहे. गोगावलेंच्या या विधानामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bharat Gogawale
Prithviraj Chavan : उदयनराजेंचा पराभव निश्चित; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं गणित

दरम्यान, राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झाल्यानंतर गोगावलेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. तसेच मागून आलेल्या आदिती तटकरेंना मंत्रिपद मिळाल्याने त्यांनी पालमंत्रिपदावरून थयथयाट केला होता. यावर गोगावले म्हणाले, आज ना उद्या मी रायगडचा पालकमंत्री होणारच आहे. आता कशाला जुन्या खपल्या काढताय? झाले गेले विसरून गेलो आहे. अशा गोष्टी राजकारणात होत असतातच, असे म्हणत त्यांनी विषय टाळला.

Bharat Gogawale
PM Modi : PM झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच 'RSS'च्या भूमीत मुक्कामी ! काय आहे कारण?

कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे कोकणातील रायगड किंवा रत्नागिरी-सिंधुदुर्गपैकी एक तरी मतदारसंघ मिळण्यासाठी शिंदे गट प्रचंड आग्रही होता. मात्र, युती या दोन्ही जागा मित्रपक्षांना गेल्याने कोकणातील शिवसेनेचे नेते नाराज झालेले आहेत. रायगड राष्ट्रवादी अजित पवार गट, तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही जागा भाजपकडे गेली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Bharat Gogawale
Wadettiwar Vs Aatram : वडेट्टीवारांनी धर्मरावबाबांचं चॅलेंज तर स्वीकारलंच शिवाय दमही भरला, म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com