Eknath Shinde: शिंदेंचा 'पॉवर' गेम'; आमदाराला मुंबईत आणण्यासाठी हैदराबादला पाठवलं प्रायव्हेट जेट

Maharashtra Assembly Election 2024 : सत्तास्थापनेच्या दृष्टीने आता पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याने युतीतील भाजपसह मित्रपक्षांनी देखील आप आपल्या आमदारांना मुंबईत आणून ठेवलं आहे. त्यातच मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हैदराबादला गेलेल्या आमदाराला मुंबईत आणण्यासाठी खास प्रायव्हेट जेट विमान पाठवल्याची माहिती समोर येत आहे.
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महायुतीनं ऐतिहासिक यश मिळवल्यानंतर आता भाजप,एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या प्रमुखांनी आपल्या विजयी आमदारांसह बैठका घेतल्या आहेत.

सत्तास्थापनेच्या दृष्टीने आता पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याने युतीतील भाजपसह मित्रपक्षांनी देखील आप आपल्या आमदारांना मुंबईत आणून ठेवलं आहे. त्यातच मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हैदराबादला गेलेल्या आमदाराला मुंबईत आणण्यासाठी खास प्रायव्हेट जेट विमान पाठवल्याची माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीत मोठी खलबतं होत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोणता चेहरा असणार याविषयीची उत्सुकता ताणली गेली आहे. तसेच भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या कोणत्या आमदारांना मंत्रीपदं मिळणार याकडेही सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे.

Eknath Shinde News
Manoj Jarange Patil : शपथविधीनंतर काही तासांतच नव्या सरकारचं टेन्शन वाढणार! जरांगे पाटलांनी ठणकावून सांगितले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सर्व आमदारांना तात्काळ मुंबईला बोलविले आहे.त्यासाठी शिवसेनेच्या विजयी उमेदवारांना मुंबईत आणण्यासाठी खास प्रायव्हेट जेट पाठवले आहे.त्यातच जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेल्या शरद सोनावणे यांच्यासाठी हेलिकॉप्टर पाठवल्याचीही जोरदार चर्चा होती. अशातच आता मराठवाड्यातील हिंगोलीमधील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यासाठी खास जेट थेट हैदराबादला पाठवण्यात आलं आहे.

कळमनुरी मतदारसंघातून विजयाचा गुलाल उधळल्यानंतर शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे वैद्यकीय कारणास्तव तत्काळ हैदराबादला रवाना झाले होते. तेथील नियोजित काम आटोपून ते सोमवारी (ता.25) मुंबईला परतणार होते. मात्र, त्याआधीच शिंदेंनी बांगर यांना आणण्यासाठी मुंबईवरून खास जेट विमान थेट हैदराबादला धाडलं.

Eknath Shinde News
Maharashtra Politic's : सत्तास्थापनेच्या घडामोडीत मोठी बातमी; मुख्य सचिवांनी घेतली अजित पवारांची भेट...

आमदार संतोष बांगर यांना तातडीने मुंबईला येण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदेंनी दिले आहे. त्यानुसार ते रविवारी (ता.24) सायंकाळी पाच वाजता प्रायव्हेट जेटमध्ये मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यांना इतक्या अचानकपणे महाराष्ट्राचं सत्ताकेंद्र बनलेल्या मुंबईला तातडीने का बोलण्यात आले, याविषयी तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

बांगर यांचं 30 हजारांचं मताधिक्य

मराठवाड्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं होते.कारण याठिकाणी एकूण 19 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. महायुतीत शिवसेनेचे उमेदवार संतोष बांगर आणि महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॉ.संतोष टारफे यांच्यात दुरंगी लढत होती.

कळमनुरी विधानसभा मतदारसंघात ओबीसी मतदारांबरोबरच मराठा समाजानेही बांगर यांना साथ दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आमदार बांगर यांचा विजय सुकर झाला. आमदार संतोष बांगर यांनी तब्बल 31 हजार 254 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com