Devendra Fadnavis On Drought : पाच-सात वर्षात मराठवाडा दुष्काळ मुक्त करणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शब्द

Maharashtra CM Devendra Fadnavis has once again assured that Marathwada will be made drought-free within the next 5 to 7 years : फडणवीस यांनी पुन्हा दुष्काळ मुक्तीचे आश्वासन दिले. यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणणार, असे त्यांनी सांगितले.
CM Devendra Fadanvis On Marathwada Drought News
CM Devendra Fadanvis On Marathwada Drought NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासन राबविणार आहे. 50 टीएमसी पाणी विविध प्रकल्पांद्वारे मराठवाड्यात आणण्यात येईल. यामाध्यमातून संपूर्ण मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. येत्या पाच-सात वर्षात मराठवाडा दुष्काळ मुक्त होईल, असेही ते म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर तर्फे 'उद्योग पुरस्कार 2025' देण्यात आले. यावेळी फडणवीस यांनी होते. औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुसज्ज व पुरेशी जागा असलेले औद्योगिक प्रदर्शन व सुविधा केंद्र (इंडस्ट्रियल एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर) उभारण्यात येईल. शेंद्रा आणि बिडकीनला जोडणारा इंडस्ट्रियल रिंगरोड तयार करुन, ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) क्लस्टरसाठी 5 एकर जागा देण्याची घोषणाही फडणवीस यांनी यावेळी केली.

मराठवाड्यातील (Marathwada) दुष्काळावर भाष्य करतांना फडणवीस यांनी पुन्हा दुष्काळ मुक्तीचे आश्वासन दिले. यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणणार, असे त्यांनी सांगितले. या शिवाय कोल्हापूर व सांगलीतील अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचे 30 टीएमसी पाणी उजनीच्या माध्यमातून मराठवाड्याकडे वळविण्याची योजना जागतिक बँकेच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. त्याचाही फायदा मराठवाड्याला होणार आहे.

CM Devendra Fadanvis On Marathwada Drought News
Devendra Fadnavis News : 'ट्रु बीम' ही सुविधा मराठवाड्यातील कर्करोगाच्या रुग्णांसाठी वरदान ठरेल!

नागपूरहून गोवापर्यंत असलेला शक्तीपीठ महामार्ग हा मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमधून जाणार असून हा महामार्ग मराठवाड्यातील उद्योगांसाठी जीवन वाहिनी ठरणार आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाड्यातील पर्यटन व धार्मिक स्थळांना तसेच उद्योगांना चालना मिळेल. जेएनपीटी पोर्टच्या तीनपट मोठे बंदर वाढवण येथे उभारण्यात येत आहे. या पोर्टला नाशिक येथे जोडण्यात येणार असून यामुळे छत्रपती संभाजीनगरहून या वाढवण पोर्टला सहा ते आठ तासात मालवाहू कंटेनर पोहचणार आहेत. याचा मोठा फायदा निर्यातदार उद्योगांना होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

CM Devendra Fadanvis On Marathwada Drought News
Devendra Fadnavis On Marathwada Drought : मराठवाड्यातील आजच्या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला पहावा लागणार नाही! मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द

जायकवाडी धरणावर सौर ऊर्जा प्रकल्प

जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्मितीसाठीही विविध प्रकल्प आणले जात आहेत. त्यात प्रामुख्याने देशातील सर्वात मोठा फ्लोटिंग सोलर प्रकल्प जायकवाडी धरणावर उभारण्यात येणार आहे. काही परवानग्या मिळाल्या असून, उर्वरित परवानग्या मिळाल्यानंतर काम सुरू होईल. दिल्ली-मुंबई (डीएमआयसी) कॉरीडॉरसाठी आवश्यक पायाभूत सुविधा येथे तयार करण्यात आल्या आहेत. यामाध्यमातून देशातील पहिली स्मार्ट इंडस्ट्रियल सिटीही छत्रपती संभाजीनगरमध्ये उभारण्यात आली आहे.

CM Devendra Fadanvis On Marathwada Drought News
BJP News : शहराध्यक्ष कसा असावा ? भाजपा कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे कान टोचले!

आता या कॅरिडॉरमध्ये जागा शिल्लक नसून आता आणखी 8 हजार एकर जमीनीचे संपादन करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. संपूर्ण देशात ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) उत्पादनात मोठा हिस्सा छत्रपती संभाजीनगरचा असणार आहे. येथील ईव्ही क्लस्टरच्या विकासाला चालना दिली जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com