CM Yuva Rojgar Yojana Protest : चॉकलेट नव्हे, रोजगार हवा...! मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी रोजगार योजनेनं वाढवली सरकारची डोकेदुखी

Youth Employment Scheme : मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी रोजगार योजना अपयशी ठरल्याचा आरोप करत बेरोजगार युवकांनी नागपुरात आंदोलन तीव्र केले असून, कायमस्वरूपी रोजगार मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे
Unemployed youth stage a protest in Nagpur demanding permanent jobs under the CM Yuva Training Employment Scheme, highlighting growing dissatisfaction with the Maharashtra government.
Unemployed youth stage a protest in Nagpur demanding permanent jobs under the CM Yuva Training Employment Scheme, highlighting growing dissatisfaction with the Maharashtra government.Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur Protest : विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने घोषित केलेली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी रोजगार योजना आता सरकारासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. या विरोधात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी रोजगार योजना संघटना पाच दिवसांपासून नागपूरमध्ये आंदोलन करीत आहे. याची दखल घेतली जात नसल्याने बेरोजगार युवकांनी लोटांगण आंदोलन केले. जोपर्यंत रोजगार देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा देण्यात आला असल्याने ही योजना सरकारच्या अंगलट येणार असल्याचे दिसून येते.

नागपुरात चार दिवसापूर्वी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण सहाय्य पदाधिकाऱ्यांनी नागपूर चॉकलेट आंदोलन केलं होतं. या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक तरुणांना मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणानंतर नोकरी मिळणार अशा पद्धतीचा आश्वासनं देण्यात आली होती मात्र 11 महिन्यानंतर अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.

शनिवार (ता.13) पुन्हा दुसऱ्यांदा आंदोलन करत टेकडी रोड कडे जाण्यासाठी परवानगी मागितली असता, पोलिसांनी ती परवानगी नाकारली आणि यशवंत स्टेडियमच्या बाहेर काढून दिल्यामुळे दिल्यामुळे आंदोलक आक्रमक झाले. लोटांगण आंदोलन करत प्रशिक्षणार्थी ते बाहेर जात होते त्यामुळे पोलिसांनी त्यांना इथेच थांबून धरले त्यामुळे सगळे आंदोलक आक्रमक झाले.

विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान बेरोजगारीचा मुद्दा चांगलाच तापला होता. विरोधकांच्यावतीने मोदी सरकारवर आरोप केले जात आहेत. याची दखल घेऊन महायुती सरकारने युवकांना प्रशिक्षित करून रोजगार देण्याची घोषणा केली होती. खाजगी कंपन्यांमध्ये प्रशिक्षण दिले जाईल आणि सरकारच्यावतीने विद्यावेतन दिले जाईल असे आश्वासनही देण्यात आले होते.

Unemployed youth stage a protest in Nagpur demanding permanent jobs under the CM Yuva Training Employment Scheme, highlighting growing dissatisfaction with the Maharashtra government.
Prashant Bamb News : खोट्या प्रमाणपत्रांवर बदल्यांची 'शाळा'; शिक्षकांवरील कारवाईसाठी आमदार प्रशांत बंब आक्रमक

तसेच गरजेप्रमाणे या योजनेतील प्रशिक्षित व अनुभवी युवकांना शासकीय नोकरीत सामावून घेतल्या जाईल असा दावाही करण्यात आला होता. त्यानुसार काही युवकांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र महायुतीचे सरकार बहुमताने स्थापन झाल्यानंतर मात्र याचा विसर पडला. अल्पावधीतच ही योजना बंद पडली.

Unemployed youth stage a protest in Nagpur demanding permanent jobs under the CM Yuva Training Employment Scheme, highlighting growing dissatisfaction with the Maharashtra government.
Ambadas Danve On Devendra Fadnavis : साताऱ्यात अंमली पदार्थाचा कारखाना, राज्याला उडता महाराष्ट्र का म्हणू नये? अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

आता बेरोजगारांच्या मागण्यांची दखलही घेतली जात नसल्याने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण संघटनेच्यावतीने आंदोलन सुरू केले. चार दिवस आंदोलन केल्यानंतरही सरकार दखल घेत नाही आणि कुठलीही ठोस घोषणा केली जात नसल्याचे बघून आज लोटांगण आंदोलन करण्यात आली. आता आम्हाला चॉकलेट नव्हे तर रोजगार हवा आहे, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशा घोषणा करीत बेरोजगार युवकांनी लोटांगण आंदोलन केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com