MLA Amit Deshmukh : सत्ताधाऱ्यांनी 'देवघर' फोडले, मात्र 'देव' आमच्यासोबतच..

Comment of MLA Amit Deshmukh on Shivraj Patil Chakurkar : 'देवघर' हे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निवासस्थानाचे नाव आहे. त्यांच्या स्नुषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमित देशमुख यांनी प्रथमच आज जाहीरपणे वक्तव्य केले.
MLA Amit Deshmukh- Senior Leader Shivraj Patil Chakurkar
MLA Amit Deshmukh- Senior Leader Shivraj Patil ChakurkarSarkarnama
Published on
Updated on

सुशांत सांगवे

Latur Congress Political News : सत्ताधाऱ्यांनी आपल्या कार्यकाळात इतरांची घरे फोडण्याचे काम केले. मराठवाड्यात बीड, नांदेड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर येथील घरी त्यांनी फोडली. लातूर हा अपवाद राहील असे वाटत होते. पण, लातूरमधील तर चक्क 'देवघर' सत्ताधाऱ्यांनी फोडले. मात्र देवघरातील 'देव' आमच्यासोबत आहे, अशा शब्दात माजी मंत्री, काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी फोडफोडीच्या राजकारणावर शनिवारी टिपण्णी केली.

लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे लातूर काँग्रेसच्या वतीने लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण, जालना येथील खासदार डॉ. कल्याण काळे यांचा जाहीर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी (Amit Deshmukh) अमित देशमुख यांनी भाजपकडून सुरू असलेल्फोया डाफोडीच्या राजकारणावर हल्ला चढवला.

'देवघर' हे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निवासस्थानाचे नाव आहे. त्यांच्या स्नुषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमित देशमुख यांनी प्रथमच आज जाहीरपणे वक्तव्य केले. सत्ताधाऱ्यांनी 'देवघर' फोडले असले तरी शिवराज पाटील चाकूरकर हे आमच्या सोबत आहेत.

MLA Amit Deshmukh- Senior Leader Shivraj Patil Chakurkar
Congress Politics : हरियाणा निवडणुकीत काँग्रेस 'विनेश'ला मैदानात उतरवणार, सहानुभुतीच्या आडून राजकीय डाव साधणार?

आजच्या या समारंभाचे निमंत्रण आम्ही त्यांना दिले. पण त्यांनी काही अडचणी बोलून दाखवल्या. यावर वरिष्ठ मार्ग काढतील. जनसामान्यात उलटसुलट चर्चेला वाव मिळू नये, असे आम्हाला वाटते. (Latur) शिवराज पाटील चाकूरकर यांनी विलासराव देशमुख यांना राजकारणात आणले. शंकरराव चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांना राजकारणात बळ दिले. हे आम्ही कधीही विसरणार नाही, असे अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस पक्षाचे विधान परिषद गटनेते सतेज पाटील, माजी मंत्री नसीम खान, सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, कुणाल राऊत याप्रसंगी उपस्थित होते.

MLA Amit Deshmukh- Senior Leader Shivraj Patil Chakurkar
Latur BJP Politics : धीरज देशमुखांच्या विरोधात उमेदवार अन् कव्हेकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट..

चाकूरकर राजकारणातले बडे प्रस्थ..

शिवराज पाटील चाकूरकर हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रामधील वरिष्ठ नेते, भारताचे माजी गृहमंत्री व दहाव्या लोकसभेचे अध्यक्ष होते. 2010 ते 2015 दरम्यान ते पंजाब राज्याचे राज्यपाल व चंदिगढ केंद्रशासित प्रदेशाचे प्रचालक होते. 1973 मध्ये लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर ते पहिल्यांदा निवडून आले. महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांनी अनेक मंत्रीपदे भुषवली.

1980 मध्ये ते प्रथम लातूर लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून गेले. पुढील सहा निवडणुकांमध्ये त्यांनी येथून विजय मिळवला. 2004 मध्ये राज्यसभेचे सदस्यत्व मिळालेले पाटील 2004 ते 2008 दरम्यान मनमोहन सिंग मंत्रीमंडळामध्ये गृहमंत्रीपदावर होते. 26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतामधील कायदा व सुव्यवस्था राखण्यास अपयश आल्याच्या टीकेवरून पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com