Parli News: परळीत नगरसेवकांमध्ये राडा! एमआयएम अन् धनंजय मुंडे गटात धक्काबुक्की, नगराध्यक्षांचा पतीचाही समावेश

या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
Dhananjay Munde
Dhananjay Munde Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Parli News: परळी शहरातील बरकत नगर परिसरात एमआयएम आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे गटातील नगरसेवक तसंच नगराध्यक्षांचे पती बाजीराव धर्माधिकारी यांच्यात जोरदार राडा झाल्याचं वृत्त आहे. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, परळीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान दोन्ही गट आमनेसामने आले होते. यावेळी शाब्दिक चकमक होऊन वातावरण तापल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. यानंतर दोन्हीकडील नगरसेवकांमध्ये शाब्दिक वाद आणि धक्काबुक्की सारखी घटनाही घडली.

दरम्यान, या वादाचं नेमकं कारण काय? तसंच यामध्ये नेमके कोणते नगरसेवक सहभागी होते? याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परळीतील राजकीय वर्तुळात या घटनेची चर्चा रंगली असून, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.