औरंगाबाद : शहरात येऊन गरीबांसाठी शाळा काढताय त्याबद्दल आम्ही तुमचे अभिनंदन करतो, पण खुल्ताबादला जाऊन औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेऊन राजकारण करू नका, अशा शब्दात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandarakant Khiare) यांनी एमआयएमचे नेते आमदार अकबुरुद्दीन ओवेसी (Aimim) यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्याबद्दल टीका केली.
ओवेसी हे आज शहरात ओवेसी स्कूल आॅफ एक्सलेन्सीच्या औंरगाबादच्या शाखेची पायाभरणी त्यांच्या हस्ते करण्यात आले. (Aurangabad) तत्पुर्वी अकबरुद्दीन ओवेसी यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासोबत खुल्ताबाद येथील विविध दर्गांसह औरंगजेबाच्या कबरीचे दर्शनही घेतली. (Shivsena) नेमंका यावरूनच आता वाद सुरू झाला असून शिवसेनेने ओवेसी यांच्यावर ते राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हणाले, अकबरुद्दी ओवेसी यांनी शहरात मुला-मुलीसांठी मोफत शिक्षण देणारी शाळा काढण्याचा निर्णय घेतला त्याचे मी स्वागत करतो,अभिनंद करतो. पण हे करत असतांना ज्या औरंगजेबाने हिंदूची मंदिर पाडली, अत्याचार केले, अशा क्रूर राज्याच्या कबरीवर जाऊन डोकं टेकवण्याचे कारण काय.
केवळ राजकारण करण्याच्या हेतून ओवेसी यांनी तिथे जाऊन दर्शन घेतले. दर्ग्यात जाण्याबद्दल आक्षेप असू शकत नाही. कारण तिथे मुस्लिमच नाही तर हिंदू देखील जातात. औरंगजेबाच्या कबरीवर कुणीच जात नाही, मग ओवेसी यांना तिथे जाऊन काय दाखवायचे होते.
खासदार इम्तियाज जलील यांना या माध्यमातून राजकारण करायचे आहे हेच यावरून स्पष्ट होते. ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेऊन हिंदूंच्या भावना दुखावल्या असल्याचेही खैरे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.