Ashok Chavan News : ''एवढा भला माणूस मी पाहिला नाही'' अशोक चव्हाणांचा उद्धव ठाकरेंवर कौतुकाचा वर्षाव

Uddhav Thackeray, Ashok Chavan News : छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा
Ashok Chavan News
Ashok Chavan NewsSarkarnama

Mahavikas Aghadi News : उद्धव ठाकरे यांच्या ऐवढा भला माणूस मी पाहिला नाही. मनाचा मोठा, काम करताना पूर्ण मोकळीक दिली. निर्णय घेताना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाबतीत कधी वेगळी भूमिका घेतली नाही. कोरोनाच्या काळातही त्यांची भूमिका सकारात्मक होती, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले.

महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे. या सभेमध्ये अशोक चव्हाण बोलत होते. यावेळी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, राजेश टोपे, यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत.

यावेळी अशोक चव्हाण यांनी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) जोरदार निशाणा साधला. आजच्या सत्ताधाऱ्यांनी आमदारांची फोडाफोडी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आमदार गेले, पक्ष फोडला, चिन्ह गेले, अशी परिस्थितीतही उद्धव ठाकरे काम करत आहेत. ही विराट सभा पाहिल्यानंतर कितीही गौरव यात्रा काढल्या तरी काही फरक पडणार नाही. ही मन की बात नाही, ही दिल की बात आहे, असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला.

देवगिरी किल्ल्यासारखी ही महाविकास आघाडी मजबूत आहे. कितीही मोठा भूकंप झाला तरी जे राहिले ते एकसंघ आहे. गेलेत ते कावळे, राहिले ते मावळे, असेही चव्हाण म्हणाले. महाराष्ट्रात जे कधीच घडले नाही ते मागील सहा महिन्यात घडले. राहुल गांधी यांची काय केले होते? त्यांनी फक्त लोकसभेत प्रश्न विचारले होते. त्यावर सरकार उत्तर देत नाही. राहुल गांधी यांना बोलू दिले जात नाही आहे.

राहुल गांधी यांना बोलू दिले नाही, त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द केली. त्याचबरोबर २४ तासाच्या आत घरी खाली करण्याची नोटीस दिली. हा प्रश्न फक्त राहुल गांधी यांच्यापर्यंत मर्यादीत नाही. राष्ट्रवादीच्याही खासदाराची खासदारकी रद्द केली होती. आपल्याला आगामी काळामध्ये लोकशाही या देशात टिकवायची की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com