Madhukar Chavan News
Madhukar Chavan NewsSarkarnama

Madhukar Chavan News: पुत्राच्या भाजपप्रवेशानंतर काँग्रेस सोडणार का? माजी मंत्री मधुकरराव चव्हाण म्हणाले...

Maharashtra Politics: सुनील चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या सभेला हजेरी लावून काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे संकेत मधुकरराव चव्हाण यांनी दिले आहे.

काँग्रेसचे नेते, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण (Madhukar Chavan) यांचे पुत्र सुनील चव्हाण (sunil chavan) यांनी भाजपमध्ये (bjp) प्रवेश केला आहे. त्यानंतर मधुकरराव चव्हाण हेही भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरु असताना त्यांनी याबाबत स्पष्टीकरण केले आहे.

मधुकरराव चव्हाण यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ तामलवाडी येथे झालेल्या सभेत सहभागी झाले होते, त्यावेळी त्यांनी आपण काँग्रेससोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

"नाव घेण्याची गरज नाही, किमान बदनामी करू नका, कुणी बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर मी सोडणार नाही," असा सज्जड दमही मधुकरराव चव्हाण यांनी भर सभेत विरोधकांना दिला. पुत्र सुनील चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या सभेला हजेरी लावून काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे संकेत मधुकरराव चव्हाण यांनी दिले आहे. "जी गोष्ट घडायला नको ती घडली, प्रत्येक घरामध्ये अनेक पक्ष झाले आहेत, असे मधुकरराव चव्हाण म्हणाले.

देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर असताना त्यावेळी मधुकरराव चव्हाण यांनी फडणवीसांची भेट घेतली होती. त्या आधी महाविकास आघाडीच्यावतीने ओमराजे निंबाळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी मधुकरराव चव्हाण उपस्थित नव्हते. यावेळी त्यांची अनुपस्थिती जाणवत होती. त्याच वेळी ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर त्यांनी फडणवीसांची भेट घेतल्याने या चर्चांना बळ मिळाले होते.

Madhukar Chavan News
Sunetra Pawar News: 'बारामतीची सून तुमचे फेडणार ऋण'; सुनेत्रा पवारांची भावनिक साद, तुमच्या वहिनीला जबाबदारीची जाणीव...

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी अशा दिग्गज नेत्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यातच आता धाराशिव जिल्ह्यातून पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राज्याचे माजी मंत्री आणि तुळजापूरचे माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com