Sunetra Pawar News: 'बारामतीची सून तुमचे फेडणार ऋण'; सुनेत्रा पवारांची भावनिक साद, तुमच्या वहिनीला जबाबदारीची जाणीव...

Baramati Lok Sabha Constituency2024:"माझ्या समाजकारणाची सुरुवात काटेवाडी-कण्हेरी गावापासूनच झाली आहे. तुम्ही मला जो विश्वास दिला, त्या आधारावर तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करेन. दादा नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. येथून पुढेदेखील ते माझ्या पाठीशी राहणार आहेत,"
Sunetra Pawar
Sunetra Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Baramati News: महाआघाडीच्या बारामती लोकसभेतील (Baramati Lok Sabha Constituency 2024) उमेदवार सुप्रिया सुळे यांनी कण्हेरी येथील मारोती मंदिरात नारळ फोडून प्रचाराला शुक्रवारी प्रारंभ केला.

त्याच मंदिरात शनिवारी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनीही आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. या वेळी त्यांनी बारामतीकरांना भावनिक साद घातली. "बारामती लोकसभा मतदारसंघाची ही सून आपल्या जनतेचे ऋण फेडणार," असे त्या म्हणाल्या.

तुमच्या वहिनीला नक्कीच तिच्या जबाबदारीची जाणीव आहे. एका मोठ्या पर्वाची सुरुवात मी आज करत आहे. आपला विजय निश्चित आहे, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. "माझ्या समाजकारणाची सुरुवात काटेवाडी-कण्हेरी गावापासूनच झाली आहे. तुम्ही मला जो विश्वास दिला. त्या आधारावर तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करेन. दादा नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. माझ्या कामात त्यांनी कधीही ढवळाढवळ केली नाही. येथून पुढेदेखील ते माझ्या पाठीशी राहणार आहेत," असे त्या म्हणाल्या.

Sunetra Pawar
Satara Lok Sabha News: रामराजे- उदयनराजेंच्या भेटीने खळबळ, प्रभाकर घार्गेंच्या दालनात खलबतं

माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आपली भूमिका बारामतीकरांसमोर मांडली. "पन्नास वर्षांपासून बारामती पुरंदर तालुक्यातील दुष्काळी गावांचा पाणी प्रश्न कायम आहे. याबाबत मी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बोललो. यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. वैयक्तिक सगळे वाद मतभेद सोडून मी आता अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. ही निवडणूक भावनात्मक बाजूने नाही. नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी ही निवडणूक आहे. स्थानिक पातळीवर मी एखाद्या गोष्टीचा हट्ट धरून जर काम केले तर संपूर्ण राज्यातील महायुतीला तडा जाईल, असे विजय शिवतारे म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "काल माझ्यावर येथे झालेल्या सभेत आरोप करण्यात आले. आरोप केल्याने माझ्या अंगाला भोके पडत नाहीत. बहात्तर हजार कोटींची कर्जमाफी केली असे सांगितले गेले. मात्र, ही कर्जमाफी करताना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी, पी. चिदंबरम हे सगळेजण यामध्ये होते. आम्हीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणली,"

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Vilas Ghule Murder Case
Devendra Fadnavis-Sharad Pawar-Sunetra pawar
Shirur Sunetra Pawar Ashok Pawar Abhijeet Katke  .jpg
Shivnagar Vidya Prasarak Mandal Baramati
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com