BJP News : काँग्रेसचे एम.के.देशमुख भाजपच्या गळाला; मराठवाडा पदवीधर निवडणुकीत ट्विस्ट!

Marathwada Graduate Constituency Election 2026 : सलग तीन टर्मपासून पदरी पराभव पडत असल्याने भाजपाच्या राज्यातील नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
Congress Leader M.K. Deshmukh Join BJP News
Congress Leader M.K. Deshmukh Join BJP NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. काँग्रेसचे वरिष्ठ नेते एम.के. देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश करत मराठवाडा पदवीधर मतदारसंघात नवा राजकीय ट्विस्ट निर्माण केला आहे.

  2. या प्रवेशामुळे काँग्रेसच्या उमेदवारांच्या संधींवर परिणाम होण्याची शक्यता असून भाजपचे समीकरण अधिक मजबूत झाले आहे.

  3. आगामी पदवीधर निवडणुकांमध्ये देशमुखांच्या प्रभावामुळे मराठवाड्यातील राजकारणाचा नवा अध्याय सुरू होऊ शकतो.

संदीप लांडगे

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून माजी शिक्षण उपसंचालक एम.के. देशमुख यांना जाहीर झालेली उमेदवारी नंतर अचनाक रद्द करण्यात आली. लहूजी साळवे यांना काँग्रेसने भाजपाच्या अतुल सावे यांच्याविरोधात मैदानात उतरवले होते. सावे यांना निवडणूक सोपी जावी यासाठीच देशमुख यांची उमेदवारी ऐनवेळी रद्द करण्यात आली होती, अशी चर्चा तेव्हा राजकीय वर्तुळात होती. आता निवडणुकीच्या वर्षभरानंतर उमेदवारी कापलेले तेच एम.के.देशमुख भाजपात दाखल झाले आहेत.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची तयारी भाजपाने सुरू केली आहे. आमदार संजय केणेकर यांच्यावर मतदार नोंदणी प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवत कोणत्याही परिस्थिती यावेळी पदवीधरचे मैदाना मारायचेच, असा निर्धार राज्यातील भाजप नेत्यांनी केला आहे. केंद्रातील नेतृत्वानेही महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विद्यमान आमदार या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असला तरी भाजप ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर एम.के. देशमुख यांचा भाजपमधील प्रवेश महत्वाचा मानला जात आहे.

सलग तीन टर्म राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सतीश चव्हाण मराठवाडा पदवीधरचे प्रतिनिधित्व करत आहेत. राज्यात महायुती असल्याने ही जागा कोण लढवणार? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. देशमुख यांच्या पक्षप्रवेशाने आता पदवीधरचे चित्र काहीसे स्पष्ट झाले आहे. सलग तीन टर्मपासून पदरी पराभव पडत असल्याने भाजपाच्या राज्यातील नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या मतदारसंघावर असलेले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी भाजप या क्षेत्रीतील बड्या व्यक्तीच्या शोधात होता. एम.के. देशमुख यांच्या रुपाने हा शोध संपला, असे आता बोलले जात आहे.

Congress Leader M.K. Deshmukh Join BJP News
Marathwada Graduate Constituency : मराठवाडा पदवीधरमध्ये युती नाही; कामाला लागा, अशोक चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

कोण आहेत देशमुख?

एम.के. देशमुख हे मराठवाड्यातील ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि माजी शिक्षण उपसंचालक आहेत. उपसंचालकपदावर असताना त्यांनी शिक्षक, शिक्षणाधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्यात समन्वय साधत काम केले. निवृत्तीनंतर राजकारणाकडे त्यांचा कल वाढला आणि काँग्रेसने त्यांना पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, अखेरच्या क्षणी तिकीट लहू शेवाळे यांना देत काँग्रेसने देशमुख यांना बाजूला केले.

Congress Leader M.K. Deshmukh Join BJP News
Marathwada Graduate Constituency : मराठवाडा पदवीधरमध्ये सगळेच पक्ष स्वबळावर नशीब आजमावणार!

यानंतर देशमुख यांना त्यांच्या समर्थक शिक्षक व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा सल्ला दिल्यानंतर देशमुख यांनी आज हाती कमळ घेतले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देशमुखांचे स्वागत करताना शिक्षण क्षेत्रात आपला अनुभव आणि कार्यामुळे देशमुख भाजपसाठी मोठी संपत्ती ठरणार आहेत. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात आता नवे गणित तयार होईल, असे म्हटले. प्रदेशाध्यक्षांकडून देशमुख यांना मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी दिला जाणार असल्याचे हे संकेत समजले जात आहेत.

निष्ठावंताचे नाराजीनाट्य

देशमुख यांच्या प्रवेशामुळे भाजपच्या काही निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. वर्षानुवर्षे संघटनेत काम करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या पुढे बाहेरून आलेल्या नवख्या नेत्याला महत्त्व दिल्याने असंतोष वाढल्याची कुजबुज आहे. पक्षांतर्गत समन्वय साधणे आणि या नाराज गटाला विश्वासात घेणे ही देशमुख यांच्यासमोरची पहिलीच मोठी राजकीय परीक्षा ठरणार आहे.

घड्याळाचे काटे फिरवणार का?

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण हे अपराजित आहेत. 2020 च्या निवडणुकीत त्यांनी 1 लाख 16 हजार 638 मते मिळवत तब्बल 57 हजार मतांनी विजय मिळवला होता. भाजपचे शिरीष बोराळकर दुसऱ्या क्रमांकावर होते. चव्हाण यांचे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आणि स्थानिक स्तरावरील मजबूत संघटन हे त्यांचे बलस्थान आहे. परंतु, सत्ताधारी युतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) एकत्र आल्याने आगामी निवडणुकीत समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देशमुख यांच्या प्रवेशाने भाजपला शिक्षण क्षेत्रात नवा चेहरा मिळाला आहे. तर काँग्रेसला या प्रवेशाने मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीलाही नव्या स्पर्धकाची जाणीव झाली आहे. आगामी काही महिन्यांत देशमुख भाजपमध्ये किती प्रभावी ठरतात आणि पक्षांतर्गत असंतोष कितपत आटोक्यात आणतात? यावरच त्यांच्या राजकीय वजनाचे मापन होणार आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात या प्रवेशाने मोठा ट्विस्ट आला आहे.

FAQs

1. एम.के. देशमुख कोण आहेत?
एम.के. देशमुख हे मराठवाडा प्रदेशातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, जे शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात सक्रीय होते.

2. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश का केला?
भविष्यातील राजकीय स्थैर्य आणि विकासकार्यात सक्रिय सहभाग मिळावा म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले जाते.

3. या प्रवेशाचा काँग्रेसवर काय परिणाम होईल?
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात काँग्रेसची पकड ढासळू शकते आणि भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

4. मराठवाडा पदवीधर निवडणुकीवर याचा प्रभाव पडेल का?
होय, देशमुखांच्या प्रभावामुळे भाजपला फायदा होऊ शकतो.

5. भाजपसाठी या प्रवेशाचे महत्त्व काय आहे?
भाजपला मराठवाडा विभागात शैक्षणिक आणि बुद्धिजीवी वर्गाचा पाठिंबा मिळवण्यासाठी देशमुखांचा प्रवेश निर्णायक ठरू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com