Latur Congress Meeting : काँग्रेसचा आज विभागीय मेळावा ; गटबाजी, ज्येष्ठांना डावलण्याचा मुद्दा ठरणार कळीचा ?

Dozens of dignitaries attended : डझनभर मातब्बर नेते उपस्थित राहणार.
Latur Congress Meeting
Latur Congress MeetingSarkarnama
Published on
Updated on

Latur Congress Meeting : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी काँग्रेसचा विभागीय स्तरावरील कार्यकर्ता मेळावा आज लातूरातील हाॅटेल ग्रँड सरोवर येथे होत आहे. या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील डझनभर मातब्बर नेते उपस्थित राहत असले तरी जिल्ह्यातील गटबाजी, ज्येष्ठांना डावलणे हा मुद्दा बैठकीत कळीचा ठरणार का ? याकडे सगळ्यांचे लक्ष राहणार आहे.

लातूर जिल्हा काँग्रेस पक्षाचा गड मानला जातो. मात्र मागील दोन टर्मपासून भाजपाने लोकसभेची जागा मोठ्या मताधिक्याने जिंकली आहे. आता हॅट्ट्रिक करण्यासाठी त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील - चाकूरकर, माजी मुख्यमंत्री डाॅ. शिवाजीराव पाटील - निलंगेकर, विलासराव देशमुख यांनी त्यांच्या काळात गटबाजी सांभाळून काँग्रेस पक्षात एकसुत्री कार्यक्रम आखला होता.

Latur Congress Meeting
Chhagan Bhujbal: मंत्री छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर; ओबीसी नेत्यांची बैठक घेत केली मोठी घोषणा

स्थानिक स्वराज्य संस्था असो की लोकसभा, विधानसभा सगळी सत्ता काँग्रेसच्या ताब्यात असायची. मात्र अलीकडे काँग्रेस पक्षाची पकड मजबुत राहीली नाही. काँग्रेसच्या विभागीय मेळाव्याकडे अनेकांचे लक्ष लागले असून यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, दिलीपराव देशमुख, अमित देशमुख यासह डझनभर राज्यातील नेते उपस्थित राहणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हा कार्यकर्ता मेळावा असल्याने येथे खुल्या पध्दतीने संवाद होणार आहे. निलंगेकर, देशमुख व चाकूरकर अशी गटबाजी असली तरी त्याची एकत्रित मोट बांधणे पक्षातील नेत्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. निलंगा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात अनेक ज्येष्ठांनी आम्हाला पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नाही, नवख्या आलेल्यांना स्थान दिले जाते, आमची पक्षात किंमत राहीली नाही, असे उघडपणे जुन्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले होते.

त्यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील - निलंगेकर यांनी नव्या - जुन्यांचा समन्वय साधून पक्ष मजबुत ठेवून आगामी निवडणुका जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला होता. आता विभागीय मेळाव्यात ज्येष्ठ व नव्यांचा वाद कळीचा मुद्दा ठरणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

विभागीय स्तरावरील मेळावा असल्याने मराठवाड्यातील अनेक दिग्गज नेते व जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मेळाव्यात काय - काय खलबते होणार हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.

(Edited by Amol Sutar)

Latur Congress Meeting
Sanjay Raut News : नगरमधील आमदारांच्या साडू - व्याह्यांच्या गुंडगिरी विरोधात राऊत आक्रमक ; काढणार महामोर्चा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com