Ajit Pawar Death : 'जे काम होईल आणि जे होत नाही ते नाही' असं परखडपणे सांगणारा 'दादामाणूस', महाराष्ट्राच्या कुटुंबातील व्यक्ती गेल्याची भावना!

Amit Deshmukh Reaction on Baramati plane crash : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीला जात असतानाच त्यांच्या विमानाचे सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. ज्यात त्यांच्यासह 5 जनांचा मृत्यू झाला.
Amit Deshmukh Reaction On Ajit Pawar Baramati Plane Crash
Amit Deshmukh Reaction On Ajit Pawar Baramati Plane CrashSarkarnama
Published on
Updated on

Latur News : बारामती येथील विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेब यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि मनाला वेदना देणारे आहे. त्यांच्या आकस्मिक जाण्याने महाराष्ट्राने एक धाडसी, स्पष्टवक्ते आणि विकासाभिमुख नेतृत्व हरवले आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरांत आज आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती,'दादामाणूस' गेल्याची भावना व्यक्त होत आहे. माझीही तीच भावना आहे, अशा शब्दात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.

आज सकाळी बारामती विमानतळावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय अजित पवार साहेब यांच्या विमानाचा अपघात झाल्याचे वृत्त आले, तेव्हा विमानातील सर्वजण सुखरूप असावेत अशीच प्रार्थना मनात होती.

मात्र, काही वेळाने आलेली ती दु:खद बातमी मनाला सुन्न करून गेली. अजितदादा हे महाराष्ट्रातील धडाडीचे, प्रशासनावर मजबूत पकड असलेले आणि कल्पक नेते होते. 'जे काम होऊ शकते ते होईल आणि जे होत नाही ते होणार नाही'असे स्पष्टपणे सांगणारे ते एकमेव आणि निर्भीड राजकीय नेते होते, असे काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

Amit Deshmukh Reaction On Ajit Pawar Baramati Plane Crash
Ajit Pawar plane crash: संजय गांधी ते अजित पवार; विमान अपघाताने हिरावले महत्त्वाचे नेते!

सुस्पष्ट दृष्टिकोन, काटेकोर नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी ही त्यांची खास ओळख होती. माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून अतिशय प्रभावी कार्य केले. पक्ष वेगवेगळे असले तरी, पक्षाभिनिवेश बाजूला ठेवून ते आदरणीय साहेबांचा नेहमी 'आवडते मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख करत. यातूनच त्यांच्या मनाचा निर्मळपणा दिसून येत असे.

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातही ते उपमुख्यमंत्री असताना, मंत्री म्हणून माझा त्यांच्याशी निकटचा संपर्क आला. या कार्यकाळात त्यांचे नेहमीच सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.

अलीकडच्या काळातही जेव्हा जेव्हा त्यांची भेट झाली, तेव्हा त्यांची तीच आपुलकी आणि सहकार्याची भावना अनुभवायला मिळाली. केवळ माझ्याच बाबतीत नव्हे, तर महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांशी त्यांचे सौहार्दाचे, सहकार्याचे आणि जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत.

आज अचानकपणे आपण अशा धाडसी, विकासाभिमुख आणि लोकप्रिय नेतृत्वाला मुकलो आहोत. आम्ही सर्व देशमुख कुटुंबीय, पवार कुटुंबीयांच्या या दुःखात सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर आज लातूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व प्रचार कार्यक्रम व सभा रद्द करण्यात येत आहेत, असेही अमित देशमुख यांनी कळवले आहे.

Amit Deshmukh Reaction On Ajit Pawar Baramati Plane Crash
Ajit Pawar death news : अजितदादांशिवाय राज्याचं राजकारण बेचव अन् आळणी; संजय राऊतांची प्रतिक्रिया

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com