Congress Politics : काँग्रेसकडून कारवाईचा दंडुका सुरूच, महिला जिल्हाध्यक्षाची पक्षातून हकालपट्टी, थेट निलंबन...

Congress District President Suspends : भाजपला मदत केल्याप्रकरणी काँग्रेसच्या सात नगरसेवकांपाठोपाठ आता पक्षातील अन्य दोन जणांचे पक्षातून निलंबन केले आहे.
Congress
Congress Sarkarnama
Published on
Updated on

Jalna Politics News : महानगर पालिकेच्या स्वीकृत सदस्य पदाच्या निवडणुकीत भाजपाला मदत करणाऱ्या काँग्रेसच्या सात नगरसेवकांवर निलंबनाच्या कारवाईचा दंडुका उगारण्यात आला. या कारवाईने जिल्हा काँग्रेसमध्ये खळबळ उडालेली असताना आज पुन्हा पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष व अन्य एका पदाधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

महापालिकेत स्वीकृत सदस्य निवडीदरम्यान भाजपला मदत केल्याप्रकरणी काँग्रेसच्या सात नगरसेवकांपाठोपाठ आता पक्षातील अन्य दोन जणांचे पक्षातून निलंबन झाले आहे. यामध्ये महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार, रशिद अजीज पहेलवान यांचा समावेश आहे. महापालिकेत काँग्रेसचे नऊ नगरसेवक निवडून आल्याने काँग्रेसला एक स्वीकृत नगरसेवक पद मिळणार होते.  

मात्र, काँग्रेसचे महापालिका गटनेते फारूक सादीक तुंडीवाले यांच्यासह सात नगरसेवकांनी स्वीकृत सदस्य पदासाठी भाजपला मदत केली. या घटनेनंतर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी प्रकरणाचा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला होता.

Congress
Congress News: जालना महापालिकेतील काँग्रेसचे 7 नगरसेवक निलंबित : प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची तडकाफडकी कारवाई

पक्षविरोधी भूमिका घेतल्याबद्दल फारूक सादीक तुंडीवाले, इम्रान खान अमानुल्ला खान, फरहान अ. रऊफ अंसारी, सुनील अशोक बोराडे, मयुरी दिनेश देने, रुबीना माजीद पठाण व अनिल अशोक तिरुखे यांना निलंबित केल्यानंतर शुक्रवारी या प्रक्रियेमध्ये मदत करणाऱ्या महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार आणि रशिद अजीज या दोघांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी या कारवाईची अंमलबजावणी केली. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक निवडीमध्ये भाजपला मदत केल्या प्रकरणी सात नगरसेवकांसह दोन पदाधिकाऱ्यांचे आतापर्यंत काँग्रेसे निलंबन केले आहे. यातून प्रदेशाध्यक्षांनी कुठल्याही प्रकारे पक्षाचा विश्वास घात किंवा गद्दारी खपवून घेतली जाणार नाही, असा संदेश दिला आहे.

Congress
Congress News : काँग्रेसचा गटनेताच फुटला!जालना महापालिकेत नाचक्की; एक स्वीकृत सदस्य करण्याची संधीही हुकली!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com