PM Care Fund News : कोरोना महामारीनंतरही देणग्यांचा ओघ सुरूच; पीएम केअर्स फंडाला मिळाला इतका निधी

Corona pandemic donations News : कोरोनाच्या काळात नागरिकांना तातडीने सोयी-सुविधा मिळाव्या यासाठी पीएम केअर फंडाची सुरुवात करण्यात आली होती.
Pm Narendra Modi
Pm Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : 2020 साली कोरोना साथीच्या रोगामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन किंवा संकटाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि बाधितांना दिलासा देण्याच्या प्राथमिक उद्देशाने समर्पित निधी असण्याची गरज लक्षात घेऊन पीएम केअर फंडाची स्थापना करण्यात आली होती. कोरोनाच्या काळात नागरिकांना तातडीने सोयी-सुविधा मिळाव्या यासाठी पीएम केअर फंडाची सुरुवात करण्यात आली होती. पीएम केअर्स फंडासाठी 2022-23 या आर्थिक वर्षातही तब्बल 912 कोटी रुपये मिळाले आहेत. कोरोना महामारीनंतरही पीएम केअर्स फंडसाठी देणग्यांचा ओघ सुरूच असल्याचे दिसत आहे.

कोरोना साथीमुळे देशात लॉकडाऊन झाल्यानंतर 27 मार्च 2020 रोजी पीएम केअर फंडाची नोंदणी कायदा 1908 अंतर्गत सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट म्हणून नोंदणी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे पीएम केअर फंडाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. त्यासोबतच संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि वित्त मंत्री हे या निधीचे पदसिद्ध विश्वस्त आहेत. पंतप्रधान, पीएम केअर्स फंडाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती के. टी. थॉमस (निवृत्त) आणि कारिया मुंडा यांची विश्वस्त म्हणून नियुक्ती केली आहे.

Pm Narendra Modi
Santosh Deshmukh Case : "मुख्यमंत्रीसाहेब नंतर पश्चात्ताप होईल..."; संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा

पीएम केअर फंड 2020 मध्ये सुरु करण्यात आला होता. त्यानंतर 2019-20 ते 2021-22 या कालावधीत देखील या फंडात सरकारी आणि खासगी कंपन्यांनी मदत केली. पीएम केअर्स फंडासाठी 2022-23 या आर्थिक वर्षातही तब्बल 912 कोटी रुपये मिळाले आहेत.

पीएम केअर फंडसाठी 2022-2023 या दरम्यान ऐच्छिक योगदान म्हणून 909.64 कोटी रुपये आणि परदेशी योगदान म्हणून 2.57 कोटी रुपये मिळाले आहेत. 912 कोटी रुपयांच्या देणग्यांव्यतिरिक्त पीएम केअर फंडाला व्याज उत्पन्न म्हणून 170.38 कोटी रुपये मिळाले आहेत. त्यापैकी 154 कोटी नियमित खात्यांवरील व्याज आणि 16.07 कोटी विदेशी खात्यातून मिळालेले आहेत.

Pm Narendra Modi
Santosh Deshmukh Murder : बीडमध्ये जे काही घडलंय, त्याला धनंजय मुंडेंची कार्यपद्धती जबाबदार; स्वपक्षातील नेत्याने साधला निशाणा

केंद्र व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी चालवल्या जाणाऱ्या सरकारी रुग्णालयांना 50,000 मेड इन इंडिया व्हेंटिलेटरच्या खरेदीतून परतावा आणि 2021-22 कोटींसह विविध स्त्रोतांकडून सुमारे 225 कोटी रुपये परताव्याच्या स्वरूपात मिळाले आहेत. देयके आणि वितरणाबाबत पीएम केअर फंडाने 2022-23 या आर्थिक वर्षात एकूण 439 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

Pm Narendra Modi
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख खून प्रकरणी अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप; ‘फरारी तीन आरोपींचा मर्डर..?’ (Video)

मुलांसाठी पीएम केअरवर 346 कोटी रुपये तर 99,986 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरच्या खरेदीसाठी 91.87 कोटी रुपये तर कायदेशीर प्रक्रियासाठी 24,000 रुपये. तसेच आर्थिक वर्ष 2022-23 च्या अखेरीस पीएम केअर्स फंडातील क्लोजिंग बॅलन्स 6,284 कोटी रुपये होते. जे 2021 च्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस 5,416 कोटी रुपयांच्या तुलनेत 16 टक्क्यांनी जास्त होते.

2020-21 च्या शेवटी 7,014 कोटी रुपये आणि 2019-20 च्या अखेरीस 3,077 कोटी रुपये शिल्लक राहिले होते. एकूण 2019-20 ते 2022-23 या चार वर्षांत पीएम केअर फंडाला एकूण 13,605 कोटी रुपये मिळाले. ऐच्छिक योगदान 13,067 कोटी आणि परदेशी योगदान 538 कोटी रुपये आणि या कालावधीत व्याज उत्पन्न म्हणून 565 कोटी रुपये मिळाले.

Pm Narendra Modi
Ncp News : राज्य मंत्रिमंडळातील नाराजीनाट्य संपेना; अजितदादांच्या 'या' विश्वासू मंत्र्यांने स्वीकारला नाही पदभार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com