Beed News : मारहाण प्रकरणात दादा खिंडकर याचा जामीन अर्ज फेटाळला

The court rejects the bail application of Dada Khindkar in the Beed assault case : दादा खिंडकर याच्या जिवीताला वाल्मीक कराड याच्यापासून धोका असल्याची तक्रार त्याची पत्नी अश्‍विनी खिंडकर यांनी तुरुंग अधिकाऱ्यांकडे केल्यानंतर त्याची रवानगी छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात करण्यात आली.
Beed Crime News
Beed Crime NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political : 23 जानेवारी 2024 रोजी ओमकार ज्ञानोबा सातपुते या तरुणाला दादा खिंडकर, आकाश दळवे, पप्पू घुले, सोन्या चव्हाण, ओंकार घुले, ज्योतीराम भटे, ऋषीकेश जाधव व संजय बावणे या आठ जणांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. 12 मार्च रोजी पिंपळनेर पेालिस ठाण्यात कट रचून अपहरण व जिवे मारण्याचा प्रयत्न या कलमाखाली त्याच्यावर गुन्हा नोंद झाला.

जिल्हा कारागृहात असलेल्या दादा खिंडकर याच्या जिवीताला वाल्मीक कराड याच्यापासून धोका असल्याची तक्रार त्याची पत्नी अश्‍विनी खिंडकर यांनी तुरुंग अधिकाऱ्यांकडे केल्यानंतर त्याची रवानगी छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात करण्यात आली. (Beed Crime News) दरम्यान, त्याच्या जामिनासाठी बीडच्या न्यायालयात अर् दाखल करण्यात आला होता. तो न्यायालयाने फेटाळला आहे.

धनंजय देशमुख यांचा साडू असलेला दादा खिंडकर याने तरुणाला अमानुष मारहाण केल्याच्या व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. (Chhatrapati Sambhajinagar) दादा खिंडकर याच्यावर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याची न्यायालयाने तुरुंगात रवानगी केली. दादा खिंडकर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांना स्वतः शरण आला होता.

Beed Crime News
Beed News : वाल्मीक कराडपासून दादासाहेब खिंडकरच्या जि‍विताला धोका, पत्नीचे अधीक्षकांना पत्र!

दादा खिंडकरला अटक केल्यानंतर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी खिंडकर याच्यावर गंभीर आरोप केले. खिंडकर याने घरावर हल्ला करत त्यांच्या गाडीची तोडफोड केली होती. या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे. याशिवाय खिंडकर याच्यावर घरफोडी, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे यासाठीही गुन्हे नोंद झालेले आहेत.

Beed Crime News
Beed : अजितदादांनी शब्द खरा केला... बीडमध्ये पहिली गँग सुतासारखी सरळ! 3 वर्षांनंतर निघालं राखेचं टेंडर

नुकताच बीडच्या कारागृहात सरपंच संतोष देशमुख खून व खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मीक कराड, सुदर्शन घुले व बबन गित्ते समर्थक महादेव गिते, अक्षय आठवले यांच्यात हाणामारी झाल्याचे समोर आले होते. कराड व घुले यांना मारहाण झाल्याचा दावा भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केला होता. तर महादेव गित्ते यांनी आम्हालाच कराड याच्या सांगण्यावरून मारहाण झाली आहे, सीसीटीव्ही फुटेज तपासा, अशी मागणी केली होती.

Beed Crime News
Dhananjay Deshmukh : ...तर न्यायाधीशांनी त्या पोलिस अधिकाऱ्यांसोबत होळी खेळण्याची हिम्मत केली नसती; होळीच्या त्या फोटोवर धनंजय देशमुखांची नाराजी

या पार्श्वभूमीवर महादेव गित्ते याच्यासह काही आरोपींची रवानगी बीड कारागृहातून छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात करण्यात आली होती. त्याचवेळी दादा खिंडकर यालाही बीड कारागृहातून संभाजीनगरला हलवण्यात आले होते. त्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली, तेव्हा तो फेटाळण्यात आला.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com