Beed : अजितदादांनी शब्द खरा केला... बीडमध्ये पहिली गँग सुतासारखी सरळ! 3 वर्षांनंतर निघालं राखेचं टेंडर

Beed News : 3 वर्षांनंतर राख उचलण्यासाठीचे टेंडर निघाले आहे. त्यानुसार, ऑनलाईन लिलावात सहभागी झालेल्या 18 कंपन्यांनी राख उचलण्यास सुरुवात केली आहे.
Ajit Pawar, Parli Ash
Ajit Pawar, Parli Ash
Published on
Updated on

Beed News : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर परळीतील माफियागिरी संपूर्ण राज्यात गाजली. भूखंड माफिया, राख माफिया, वाळू माफिया अशा विविध माफिया गँग तालुक्यात अॅक्टिव्ह होत्या. पण या सगळ्या गँग सुतासारख्या सरळ करणार अशी घोषणा बीडचे पालकमंत्री होताच अजित पवार यांनी केली होती. त्यानुसार त्यांनी पहिली गँग संपवली आहे.

तब्बल 3 वर्षांनंतर राख उचलण्यासाठीचे टेंडर निघाले आहे. त्यानुसार, ऑनलाईन लिलावात सहभागी झालेल्या 18 कंपन्यांनी राख उचलण्यास सुरुवात केली आहे. या ई-लिलावात सहभागी कंपन्यांच्या वाहनांना पोलिसांनी संरक्षण दिले आहे. 325 रुपयांना एक टन राख याप्रमाणे याचा महसूल माफियांऐवजी शासनाच्या तिजोरीत जमा होणार आहे.

Ajit Pawar, Parli Ash
Yogesh Kadam visit Beed : फरार कृष्णा आंधळेविषयी गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं मोठं विधान...

परळीतील औष्णिक विद्युत केंद्रातून निर्माण होणारी राख दाऊतपूर, वडगाव आणि डाबी शिवारातील तळ्यात साठवली जाते. कालपर्यंत माफियांसाठी ही राख म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी होती. या राखेमुळे परिसरात वीटभट्ट्याही बेसमुमार वाढल्या. दुसऱ्या बाजूला यामुळे परळीकरांच्या आरोग्याचा प्रश्न झाला. पर्यावरणाची हानी आणि शेतीचे नुकसान होत होते. अवैध राख वाहतुकीमुळे अनेकदा अपघात, दोन टोळ्यांमध्ये भांडणाचे प्रकारही घडले.

मागची तीन वर्षे याचा लिलावच होत नव्हता. लिलाव झाला तर माफिया कंपन्यांची वाहने आत जाऊ देत नसत. या राखेमुळे गुन्हेगारी आणि माफियांचे खिसे भरत होते. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मीक कराड याचेच या राखेवर अधिराज्य होते. बीडमधील या माफियागिरीवर वारंवार आवाज उठविण्यात येत होता.

Ajit Pawar, Parli Ash
Ajit Pawar On Beed Crime: अखेर अजितदादांचा एकच इशारा अन् बीडच्या गँगला घामच फुटला, थेट टायरची थर्ड डिग्री....

अखेर याची दखल सरकारने घेतली असून या राखेचा लिलाव करण्याच्या सूचना औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र प्रशासनाला दिल्या आहे. आता रोज साधारण 200 वाहनांच्या वाहतूकीतून दोन लाख 60 हजार याप्रमाणे वर्षाकाठी शासनाला 10 कोटींहून अधिक महसूल शासनाला मिळेल, असा अंदाज आहे. याप्रमाणे हिशोब लावल्यास मागच्या तीन वर्षांपासून लिलाव न झाल्याने 50 कोटींहून अधिक रकमेची माया केवळ राखेतून माफियांनी जमवली असे समोर येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com