Beed Agitation Maratha News : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी (ता. ३०) जिल्ह्यात हिंसक वळण लागले. शासकीय मालमत्तांसह नेत्यांची घरे जाळण्याच्या आणि दगडफेकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या.
त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दिपा मुधोळ - मुंडे यांनी काढले. दरम्यान, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्यांना जिल्ह्यात पाचारण करण्यात आले असून, उशिरा या दोन तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आज माजलगाव येथे आमदार सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक व वाहने जाळण्यासह माजलगाव येथील नगर पालिकेला आग आणि इतर काही कार्यालयांवर दगडफेकीच्या घटना घडल्या, तर शहरातदेखील आमदार क्षीरसागर, सोळंके यांच्या बंगल्यांना व राऊत यांच्या हॉटेलला तसेच राष्ट्रवादी भवनला पेटविल्याच्या घटना घडल्या.
तसेच अनेक ठिकाणी दगडफेक करून नुकसान करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या मागविण्यात आल्या आहेत. दरम्यान, बीड शहर व तालुक्यांच्या पाच किलोमीटर अंतरात ही संचारबंदी लागू असेल. तसेच राष्ट्रीय महामार्गावरदेखील संचारबंदी लागू असेल.
शहरात दगडफेक आणि आगीच्या घटनांमुळे परिस्थिती अटोक्याबाहेर गेली. यानंतर रात्री आठ वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर फौजफाट्यासह शहरातील रस्त्यांवर उतरले. या तिघांची सुभाष रोडवर चर्चा झाली व यानंतर तातडीने संचारबंदीची सूत्रे हालली.
कोणीही कायदा हातात घेऊ नये, दगडफेक व जाळपोळीच्या घटना करू नयेत. जिल्हा प्रशासन संपूर्णपणे सतर्क आहे. आपल्या मागण्या लोकशाही पद्धतीने मांडायला हव्यात, असं आवाहन बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांनी केले आहे.
शहरातील परिस्थिती अटोक्यात आहे. राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या मागविण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले, तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिलाआहे.
(Edited By - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.