Beed Political News : पेटलेल्या बीडमधून मोठी बातमी समोर; जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदी लागू

Maratha Protest News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्याच्या विविध भागात आंदोलन, उपोषण, निदर्शने सुरू आहेत.
Beed Political News
Beed Political News Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यात हिंसक वळण लागले. (Beed News)एसटी बसेसवर दगडफेक, त्या जाळणे, तहसीलदारांच्या गाडीवर हल्ले, त्यानंतर लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले, तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनेमुळे बीड जिल्हा हादरला आहे.

Beed Political News
Beed Latest News : बीडमध्ये मध्यरात्री तहसीलदारांची गाडी पेटविली !

आज दिवसभरात बीड शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन होऊन खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Maratha Reservation) या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. (Beed News) या संदर्भात नुकतेच त्यांनी आदेश जारी केले असून, पुढील आदेशापर्यंत हे संचारबंदी आदेश लागू राहणार आहे.

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी काढलेल्या आदेशानुसार बीड जिल्हा मुख्यालय व सर्व तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटरच्या हद्दीपर्यंत, तसेच सर्व राष्ट्रीय महामार्गांवर हे संचारबदी आदेश लागू असणार आहे. (Marathwada) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्याच्या विविध भागात आंदोलन, उपोषण, निदर्शने सुरू आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

२९ आॅक्टोबरच्या मध्य रात्रीपासून या आंदोलनाला जिल्ह्यात हिंसक वळण लागले. एसटी बसेस तसेच शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांना आग लावण्याचे प्रकार घडले. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणेज आज अनेक शासकीय कार्यालयांवर मोर्चे काढून आंदोलकांनी ती बंद केली, तर काही ठिकाणी कार्यालयांवर दगडफेक करून आग लावण्याचे प्रकार घडले. शासकीय आणि खासगी कार्यालयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

मोठ्या प्रमाणावर हानी होत असल्याची खात्री झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता१९७३ चे कलम १४४ (२) अन्वये संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. दरम्यान, आज दिवसभर बीड जिल्हा हिंसक घटनांना धुमसत होता. माजलगावचे राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर मराठा आंदोलकांनी दगडफेक करत तो जाळला. बंगल्याच्या आवारात असलेली वाहनेही पेटवून देण्यात आली. या घटनेत मोठे नुकसान झाले. या घटनेनंतर काही तासांनीच पुन्हा माजलगाव नगर परिषदेचे कार्यालय आंदोलकांनी पेटवून दिले.

Beed Political News
Maratha Reservation News : मंत्री, आमदार, खासदारांच्या घर, कार्यालयावर पोलिसांचा खडा पहारा...

माजलगावमध्ये ही घटना घडल्यानंतर बीड शहरातही लोकप्रतिनिधींना लक्ष्य करण्यात आले. राष्ट्रवादी भवन (शरद पवार गट) आंदोलकांनी पेटवून दिले. त्यानंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार संदीप क्षीरसागर यांचे निवासस्थान आंदोलकांनी पेटवून दिले. तिथे असलेल्या वाहनांचीही राख रांगोळी करण्यात आली.

या शिवाय भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांच्या संपर्क कार्यालयावरही दगडफेक करण्यात आली, तर राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या सुभाष रोडवरील बंगल्यावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला; पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांना हुसकावून लावले आणि पुढील अनर्थ टळला.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com