Daharashiv Lok Sabha Election News: धाराशिवमध्ये ट्विस्ट; राष्ट्रवादीला जागा सुटल्यास 'ही' नावे चर्चेत !

Political News : महायुतीचे जागावाटप लवकरच जाहीर केलं जाणार असून त्यामुळे कुठल्या पक्षाला कुठल्या जागा मिळणार हे फायनल होणार आहे. सर्वांचे त्याकडे लक्ष लागले असतानाच धाराशिवमध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झाला असून या जागेवर महायुतीमधील तीन पक्षांनी दावा केला आहे.
Eknath Shinde, Devendra Fadnvis, Ajit Pawar
Eknath Shinde, Devendra Fadnvis, Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असतानाच महाविकास आघाडी व महायुतीकडून जागावाटपावर चर्चा सुरु आहे. महायुतीचे जागावाटप लवकरच जाहीर केलं जाणार असून त्यामुळे कुठल्या पक्षाला कुठल्या जागा मिळणार हे फायनल होणार आहे. सर्वांचे त्याकडे लक्ष लागले असतानाच धाराशिवमध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झाला असून या जागेवर महायुतीमधील तीन पक्षांनी दावा केला आहे.

महायुतीतील कोणत्या पक्षाला धाराशिव लोकसभा मतदारसंघ मिळणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. ते निश्चित झाल्यानंतर उमेदवार ठरवतानाही संबंधित पक्षाला कसरत करावी लागणार आहे. महायुतीत हा सस्पेन्स कायम असताना महाविकास आघाडीतील शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची बुधवारी शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली असल्याने त्यांनी प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnvis, Ajit Pawar
Lok Sabha Election 2024 : 'मजलिस को उखाड फेको' म्हणणाऱ्या अमित शाहांना उमेदवार मिळेना; जलील यांनी डिवचलं!

धाराशिवमध्ये ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याशी दोन हात करायला शिंदे शिवसेनेचे जिल्ह्यातील अनेक नेते तयार आहेत. यात प्रामुख्याने माजी खासदार रवींद्र गायकवाड, पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत (Tanaji Sawant), त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांची नावे समोर येत आहेत. दुसरीकडे भाजपकडून बसवराज पाटील (Baswraj Patil), माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, संताजी चालुक्य यांची नावे चर्चेत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुरेश बिराजदार इच्छुक असल्याची चर्चा आहे.

दरम्यान बुधवारपासून वेगळीच चर्चा सुरु झाली असून मंगळवारी पुण्यात झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने धाराशिव मतदारसंघावर दावा केला आहे. मराठवाड्यातील परभणी मतदारसंघ महादेव जानकार यांच्या रासपला सोडला जाण्याची शक्यता असल्याने धाराशिव मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आग्रही असल्याचे समजते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सस्पेन्स कायम...

हा मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याचा ठरला तर उमेदवार कोण असणार यावरही चर्चा झाल्याचे समजते. त्यामध्ये राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्या सुरेश बिराजदार यांच्यासह माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, हे देखील भाजपसोडून घड्याळ चिन्हावर लढणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे विधानपरिषदेचे सदस्य विक्रम काळे यांचे नावही ऐनवेळी पुढे येण्याची शक्यता आहे. ही चर्चेत नसलेली नावे अचानक राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुढे आल्याने सर्वाना ही जागा कोणाला सुटणार व उमेदवार कोण असणार याची उत्सुकता लागून राहिली आहे,

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील काही इच्छुक आणि नेत्यांनी मुंबईत सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यात शिंदे सेनेचे इच्छुक आणि नेत्यांसह भाजपचे इच्छुक आणि आमदारांचा समावेश होता. जागावाटपाचा तिढा लवकर सोडवावा, अशी मागणी फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. त्यामुळे आता ही जागा कॊणाच्या पारड्यात पडणार याची उत्सुकता लागली आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnvis, Ajit Pawar
Dharashiv Lok Sabha News : धाराशिव महायुतीतला वाद पोहाेचला थेट 'सागर' बंगल्यावर; फडणवीसांनाच घ्यावा लागणार अंतिम निर्णय ?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com