Dharashiv Lok Sabha News : धाराशिव महायुतीतला वाद पोहाेचला थेट 'सागर' बंगल्यावर; फडणवीसांनाच घ्यावा लागणार अंतिम निर्णय ?

Political News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यापर्यंत पोहाेचला आहे. या ठिकाणी फडणवीस यांच्या उपस्थित इच्छुकांची बैठक सुरू असून, या वादावर आज तोडगा काढला जाऊ शकतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ravindra gaikwad, pravinsinh pardeshi, devendra fadnavais
ravindra gaikwad, pravinsinh pardeshi, devendra fadnavais Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : धाराशिव लोकसभेच्या जागावर महायुतीमधील तीनही घटक पक्षाने दावा केला आहे. या जागेसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दावा केला आहे. तीन पक्षांकडून अनेक जण इच्छुक असल्याने हा वाद आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यापर्यंत पोहाेचला आहे. या ठिकाणी फडणवीस यांच्या उपस्थित इच्छुकांची बैठक सुरू असून, या वादावर आज तोडगा काढला जाऊ शकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सागर बंगल्यावर भाजपकडून इच्छुक असलेले सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी उपस्थित आहेत, तर शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक असलेले माजी खासदार रवींद्र गायकवाडदेखील उपस्थित आहेत. या सर्व मंडळींची बंद दाराआड चर्चा सुरू आहे.

महत्त्वाचे म्हणजे औसा येथील भाजप आमदार अभिमन्यू पवार, तुळजापूरचे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील हजर आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील वादावर उपमुख्यमंत्री फडणवीस कशा प्रकारे मार्ग काढणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. (Dharashiv Lok Sabha News )

ravindra gaikwad, pravinsinh pardeshi, devendra fadnavais
Jyoti Waghmare on Praniti Shinde: 'अति राग अन् भीक माग' अशी प्रणितीताईंची अवस्था होईल! वाघमारेंनी डिवचलं

धाराशिव मतदारसंघामध्ये शिवसेना यापूर्वी लढली आहे, त्या जागाही आपल्यालाच म्हणजे खऱ्या शिवसेनेला मिळाव्यात, अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. त्यानुसार ठाकरे गटाकडे असलेले विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात लढण्याची संधी मिळावी, असे प्रयत्न महायुतीमधील तीन पक्षांकडून सुरू आहेत. 

धाराशिवमध्ये ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याशी दोन हात करायला शिंदे शिवसेनेचे जिल्ह्यातील अनेक नेते तयार आहेत. यात प्रामुख्याने माजी खासदार रवींद्र गायकवाड, पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत (Tanaji Sawant), त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांची नावे समोर येत आहेत. दुसरीकडे भाजपकडून बसवराज पाटील (Baswraj Patil), माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, संताजी चालुक्य यांची नावे चर्चेत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुरेश बिराजदार इच्छुक आहेत.

कोणाच्या नावाची लाॅटरी लागणार

भाजपच्या 20 उमेदवारांची यादी जाहीर झाली असून, यात धाराशिवचा समावेश नाही. त्यामुळे ही जागा कोणाला सुटणार याची उत्सुकता लागली आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्यासोबत झालेल्या बंद दाराआड चर्चेत कोणाच्या नावाची लाॅटरी लागली हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

R

ravindra gaikwad, pravinsinh pardeshi, devendra fadnavais
Devendra Fadanvis News : नवनीत राणा भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार ? अमरावतीच्या जागेबाबत फडणवीसांचे मोठे संकेत

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com