Ajit Pawar : अजितदादांनी एका फोनवर वायू वेगाने फिरवली फाईल; विमानातून उतरेपर्यंत GR व्हॉट्सअपवर

Ajit Pawar Beed Projects : बीडमध्ये अजित पवारांनी फोनवर जीआर मंजूर करत व्हॉट्सअपवर आदेश मागवला, 575 कोटींच्या कामांचे उद्घाटन करत जलद निर्णयक्षम नेतृत्वाचे उदाहरण दिले.
Ajit Pawar addresses a public event in Beed after inaugurating and laying foundations for ₹575 crore development projects, showcasing swift administrative decision-making.
Ajit Pawar addresses a public event in Beed after inaugurating and laying foundations for ₹575 crore development projects, showcasing swift administrative decision-making.Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाच्या पद्धतीची कायम चर्चा होत असते. गुरुवारी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बीडच्या जनतेला या पद्धतीची प्रचिती आली. 2026 वर्षाच्या पहिल्याच दिवशी अजित पवारांनी तब्बल 575 कोटी रुपयांच्या 1363 कामांचे भूमिपुजन आणि उद॒घाटन केले. यात त्यांनी बीड शहरासाठीच्या नाट्यगृहासाठीही निधी मंजूर केला आहे. पण ही निधी मंजुरीची प्रक्रिया भुवया उंचावणारी होती.

बीड शहरासाठी महत्वाचे असणाऱ्या नाट्यगृहाची पुरती दुरावस्था यापूर्वीच अजित पवार यांच्या कानी गेली होती. त्यावर त्यांनी दुरुस्तीसाठी निधी देण्याचा शब्दही दिला होता. पवार आपल्या सहकाऱ्यांसोबत मुंबईहून विमानतळाकडे निघताच त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी आपल्या कार्यालयाचे सचिव डॉ. राजेश देशमुख यांना याबाबत सूचना केली. मंत्रालयात फोन करुन त्यांनी बीडच्या नाट्यगृहाच्या दुरुस्तीला निधी मंजूर करुन तसा आदेश काढण्याच्या सूचना दिल्या.

पवार म्हणाले, आपण छत्रपती संभाजीनगरला विमानातून उतरेपर्यंत हा शासन आदेश आपल्या व्हॉट्सअपवर आला. काम करण्याची तळमळ आणि दृष्टी लागते. म्हणूनच आपल्याला कामाचा माणूस म्हणत असल्याचेही पवार म्हणाले. नादुरुस्त नाट्यगृहामुळे कलावंतांची हेळसांड, यामुळे शहराच्या सांस्कृतिक परंपरेला येणारे अडथळे होते. यामुळे आता चकाचक नाट्यगृह उभारणार आहे.

दरम्यान, बीडकरांनी आपल्या शब्दाचा मान ठेवला. विमानतळ, तारांगण, विज्ञान पार्क, लोहमार्ग यामुळे आता बीडकरांना आपल्याकडून विकासाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र, आपणही बीडकरांच्या अपेक्षांचा भ्रमनिरास करणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. विकासकामांच्या भूमिपूजनासह परिषदेचे शिक्षक पुरस्कार वितरण, बहुजन कल्याण विभागामार्फत विद्याथर्यांना टॅबचे वाटप, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ‘दिवाळी नवीन घरात’ उपक्रमाचा समारोप, ध्वज निधी संकलनात जिल्हा राज्यात प्रथम आल्याने सत्कार असे कार्यक्रम झाले.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार बजरंग सोनवणे, आमदार विक्रम काळे, प्रकाश सोळंके, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, नगराध्यक्ष प्रेमलता पारवे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, अधीक्षक नवनीत कॉंवत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्‍वर चव्हाण, माजी आमदार संजय दौंड, शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप आदी उपस्थित होते.

अजित पवार यांनी शहरातील विकासाचे मुद्दे आणि प्रश्नांवरही उहापोह केला. आता आठ ते 10 दिवसांनी पाणी येत असून वीज बिलाचा मुद्दा सोलारने सोडवणार असल्याचे सांगीतले. लवकरच चार दिवसांआड पाणी सुरु होईल. पुढच्या टप्प्यात रोज पाणी येईल. कचरा प्रक्रीया प्रकल्प उभारण्यात येईल.

Ajit Pawar addresses a public event in Beed after inaugurating and laying foundations for ₹575 crore development projects, showcasing swift administrative decision-making.
Ajit Pawar : 'चक्की पिसींग, पिसींग, पिसींग...' : CM फडणवीसांचा डायलॉग अजित पवारांनी मारला; ठेकेदारांना भरला दम

नगराध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना बारामतीला नेऊन कामांची पद्धत दाखविणार असल्याचे सांगीतले. विमानतळ उभारणीबाबत प्राधिकरणाने केलेल्या पाहणीचा अहवाल आल्याचे त्यांनी सांगीतले. बीडमध्ये तारांगण आणि विज्ञान पार्क उभारण्यात येणार आहे. धानोरा रोडवरील पंढरी येथे उभारण्यात येणाऱ्या विज्ञान पार्कसाठी 28 कोटींचा निधी लागणार असून पहिल्या टप्प्यात 14 कोटी मंजूर केले आहेत. बाहेर राज्यातील एका पार्कचे डिझाईन निश्‍चित केले आहे. मे अखेर सी ट्रीपल आयटी कार्यान्वित होऊन प्रत्यक्ष प्रशिक्षण सुरु होईल.

Ajit Pawar addresses a public event in Beed after inaugurating and laying foundations for ₹575 crore development projects, showcasing swift administrative decision-making.
Ajit Pawar यांचा दौरा ऐनवेळी रद्द; 1 हजार विकास कामांचं भूमिपूजन लांबणीवर ।Beed News।

जिल्हा रेशीम उत्पादनात आघाडीवर असल्याने येथे रेशीम पार्क उभारणीची घोषणा करुन गेवराईला बाजार समितीकडून 14 एकर जागा भाड्याने घेऊन 15 कोटी रुपयांतून रेशीम पार्क उभारण्यात येण्याची घोषणा केली. विकास कामांसाठी सर्वांनी साथ द्यावी आणि सुचना मांडाव्यात, असे आवाहनही पवारांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com