Ladki Bahin Yojana controversy : 'लाडक्या बहि‍णीं'मुळे राज्य संकटात; आमदार संजय गायकवाड हे काय बोलून बसले... (VIDEO)

DCM Eknath Shinde Shivsena MLA Sanjay Gaikwad React to Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana in Buldhana : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर प्रतिक्रिया दिली.
Ladki Bahin Yojana controversy
Ladki Bahin Yojana controversySarkarnama
Published on
Updated on

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : राज्यात महायुती सरकार ज्या लाडकी बहिणींमुळे सत्तेत आले, त्याच लाडक्या बहिणींसाठी योजना राबविताना महायुती सरकारची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे. त्यामुळे महायुती सरकारला ही योजना आता नकोच, अशीच काहीसं झालं आहे.

आता या योजनेविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. याशिवाय आमदार गायकवाड यांनी ठाकरे बंधू यांच्या एकत्र येण्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना (Shivsena) आमदार संजय गायकवाड म्हणाले, "लाडक्या बहिणींमुळे राज्य संकटात आलं आहे, हे नाकारता येत नाही. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारासह सर्वच बाबतीत झालेला आहे. ही चूक जुलै, ऑगस्टपर्यंत भरून निघेल". अजून एकाही आमदाराला बजेटचे पैसे मिळालेले नाहीत, असेही आमदार गायकवाड यांनी म्हटले.

लाडकी बहीण योजनांसाठी लागणाऱ्या निधीची जुळवाजुळव करताना महायुती सरकारची चांगलीच दमछाक होत आहे. इतरत्र विभागांचा निधी वळवला जात आहे. समाज कल्याण खात्याचा निधी वगळण्यात आल्याचं देखील समोर आले. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीमधील वरच्या पातळीवर मंत्री लाडक्या बहीण योजनेची बाजू सावरून धरत आहे.

Ladki Bahin Yojana controversy
NCP unity : ठाकरे बंधू थेट बातमी देण्याच्या तयारीत असतानाच, मिटकरींनी अजितदादा अन् सुप्रियाताई एकत्र येण्याचा 'मुहूर्त' सांगितला

या योजनेसाठी इतरत्र खात्याचा निधी वळवण्यात आला असला, तरी महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी 2100 रुपयांचा हप्ता करू, असे दिलेल्या आश्वासनाची अजूनही पुर्तता झालेली नाही. यातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदाराने लाडक्या बहिणींमुळे राज्य संकटात आल्याचं विधान करत खळबळ उडवून दिली आहे.

Ladki Bahin Yojana controversy
Mumbai Bjp President : महापालिका रणसंग्राम आधीच तापला! मुंबई भाजप अध्यक्ष पदावरून संघर्ष; 'या' दोन नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल कधीही वाजेल. यात ही योजना टिकवून ठेवण्याचं आव्हान महायुती सरकारसमोर असताना, एकनाथ शिंदेंच्या आमदाराने या योजनेमुळे कशी अडचण निर्माण झाली, हे सांगून विरोधकांना आयतं कोलित दिलं आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या या विधानाची विरोधक कितपत दखल घेतात, हे देखील पाहण्यासारखं राहणार आहे.

...खूप उशिर झाला!

राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना, आमदार संजय गायकवाड म्हणाले, "ठाकरे बंधू दहा-पंधरा वर्षे आधी एकत्र आले असते, तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं. एकत्र येण्याच्या चर्चेला आता खूप उशीर झाला आहे". उद्धव ठाकरेंनी केलेल्या विचित्र आघाडीमुळे त्यांचा जनाधार संपलेला आहे, असा देखील टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com