Mumbai Bjp President : महापालिका रणसंग्राम आधीच तापला! मुंबई भाजप अध्यक्ष पदावरून संघर्ष; 'या' दोन नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच

BJP internal conflict News: मुंबई भाजप अध्यक्ष कोण होणार? याची जोरदार चर्चा असतानाही मुंबईचा अध्यक्ष ठरत नसल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. या पदासाठी दोघांची नावे शर्यतीत असून त्या दोन नेत्यांमध्ये या पदासाठी जोरदार रस्सीखेच पहावयास मिळत आहे.
BJP Flag
BJP FlagSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील भाजपच्या संघटनात्मक निवडी जवळपास पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच महाराष्ट्र भाजपच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून कार्याध्यक्ष असलेल्या रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवली जाणार आहे. दुसरीकडे राज्यातील सर्वच जिल्हाध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये मुंबईमधील सहाही जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात अली आहे. दुसरीकडे, मात्र मुंबई भाजप अध्यक्ष कोण होणार? याची जोरदार चर्चा असतानाही मुंबईचा अध्यक्ष ठरत नसल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. या पदासाठी दोघांची नावे शर्यतीत असून त्या दोन नेत्यांमध्ये या पदासाठी जोरदार रस्सीखेच पहावयास मिळत आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे तयारी जोरात सुरु आहे. मात्र, मुंबई महापालिका हा शिवसेनेचा (Shivsena) गड राहिला आहे. हा गड काबीज करण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून भाजपकडून तयारी केली जात आहे. त्यासाठी मुंबई भाजपचा अध्यक्ष ठरत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मुंबई भाजपचे विद्यमान अध्यक्ष अशिष शेलार यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपद आले आहे. त्याचवेळी मुंबईची अध्यक्षपदाची जबाबदारी देखील आतापर्यंत त्यांच्याकडे होती.

BJP Flag
ShivSena Mahayuti : शिवसेनेतील मंत्रीच एकनाथ शिंदेंना महायुतीत तोंडघशी पाडत, तर नाही ना?

येत्या काळात मुंबई महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मुंबई भाजपचे (BJP) अध्यक्षपद पूर्णवेळ एका व्यक्तीकडे देण्यात यावे, अशी मागणी आहे. यामुळे मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी आमदार प्रवीण दरेकर, आमदार अमित साटम यांची नावे चर्चेत आहेत. यापूर्वी चर्चेत असलेली आमदार अतुल भातखळकर, माजी आमदार सुनील राणे यांची नावे मागे पडली आहेत. आता या पदासाठी दरेकर व साटम यांच्यात जोरदार रस्सीखेच आहे.

BJP Flag
BJP Politics : महापालिकेत सत्ता, शहरात तीन आमदार... तरी भाजपला सुधाकर बडगुजर का हवेत?

सध्या दरेकर आणि साटम यांच्यात जोरदार स्पर्धा सुरु आहे. दरेकर आणि साटम दोघेही गेले अनेक दिवस मुंबई अध्यक्ष पदाची माळ आपल्या गळ्यात पडावी, यासाठी फिल्डिंग लावली आहे. पण अद्यापही अधिकृत घोषणा झालेली नाही. मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी या दोघापैकी एकाचे नाव फायनल केले जाणार आहे.

BJP Flag
Tuljapur drugs case: तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट; माजी नगराध्यक्षाच्या पतीला कोर्टाच्या आवारातून नाट्यमयरित्या ठोकल्या बेड्या

मुंबई भाजप अध्यक्ष कोण होणार ? याची जोरदार चर्चा सुरु आहे. दरेकर आणि साटम या दोघांपैकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाच्या बाजूने कौल देतायेत याकडे लक्ष लागले आहे. प्रविण दरेकर यांनी कॅबिनेटमध्ये वर्णी लागावी यासाठी खूप प्रयत्न केले होते पण दरेकरांची वर्णी लागली नाही. यामुळे किमान आता तरी मुंबई अध्यक्षपदाची वर्णी लागेल अशी जोरदार चर्चा आहे. अंतिम नाव गेल्या अनेक दिवसापासून घोषित केले जात नसल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

BJP Flag
Nitesh Rane : तुळजापुरात पाऊल ठेवताच नितेश राणेंचे मोठे विधान; ठाकरे ब्रँड संपण्याचे थेट कारणच सांगितले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com