Ramesh Bornare Got Letter of Threaten : आमदार रमेश बोरनारे यांना जीवे मारण्याची धमकी

Eknath Shinde : आम्ही धमक्यांना घाबरत नाही म्हणत मुख्यमंत्र्यांनी ठणकावले
Ramesh Bornare
Ramesh BornareSarkarnama
Published on
Updated on

Thackeray Vs Shinde Group : वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांना धमकीचे पत्र आले आहे. या पत्रातून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आमचे आमदार अशा धमक्यांना घाबरत नसल्याचे सांगितले. ते म्हणाले "आमदार बोरनारे यांना धमकी आलेली आहे. त्यानुसार तक्रार दाखल आहे. आमचे गृहविभाग सक्षम आहे. ते याचा छडा लवतील. अशा धमक्यांना आमचे आमदार घाबरत नाहीत."

Ramesh Bornare
APMC Election : राष्ट्रवादीचे दोन्ही गट म्हणतात; भाजप आमच्यासोबत, हिंगणघाटात मोठा पेच…

आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) प्रथमच २०१९ मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले आहेत. माजी आमदार वाणी यांनीच त्यांची शिफारस केली होती. त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सभा घेतली होती. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार बोरनारे यांनी शिंदे गटात जाणे पसंत केले. परिणामी त्यांच्या मतदारसंघातील अनेक शिवसैनिक त्यांच्यावर नाराज असल्याचे काही घटनांच्या माध्यमातून समोर आले आहे.

Ramesh Bornare
Amravati Pattern : दिल्लीत तलवारी आणि गल्लीत यारी; अमरावतीत भाजप-काँग्रेसची युती!

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची शिवसंवाद यात्रेचे आयोजन केले होते. त्यावेळी यात्रेवर दगडफेक झाली होती. ही दगडफेक आमदार रमेश बोरनारे यांनी घडवून आणल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. मात्र आमदार बोरनारे हे संयमी व्यक्तीमत्व आहे. ते असले प्रकार करणार नाहीत, असे म्हणत शिंदे गटाकडून त्यांची पाठराखण करण्यात आली होती.

Ramesh Bornare
Karnataka Election 2023 : भाजपला मोठा झटका ; तिकीट न मिळाल्याने माजी उपमुख्यमंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश..

आता बोरनारे यांना धमकीचे पत्र आले आहे. त्यात त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पोलीस तपास करतील, मात्र यापूर्वी घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातारण चांगलेच तापणार असल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com