APMC Election : राष्ट्रवादीचे दोन्ही गट म्हणतात; भाजप आमच्यासोबत, हिंगणघाटात मोठा पेच…

Hinganghat : वेगवेगळ्या पक्षांच्या गटांची वेगवेगळी युती झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
HInganghat APMC
HInganghat APMCSarkarnama
Published on
Updated on

Vidarbha APMC Elections : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील २८० कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. नागपूर नजीकच्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण येथे राजकीय दृष्ट्या मोठा पेच निर्माण झाला आहे. (A big embarrassment has arisen politically)

विदर्भातील मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हिंगणघाटची गणना होते. कृषी उत्पन्न बाजार समितीत वेगवेगळ्या पक्षांच्या गटांची वेगवेगळी युती झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप आणि शेतकरी संघटनेच्या शेतकरी विकास आघाडीकडून उमेदवारांनी रिंगणात उतरण्याची तयारी केलेली आहे. येथे भारतीय जनता पक्षाची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदारांचा एक गट, शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि देवळी विधानसभा मतदारसंघातील भाजपचा एक गट एकत्र आला असून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यामुळे विदर्भातील मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गणना होणाऱ्या हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत वेगवेगळ्या पक्षांच्या गटांची वेगवेगळी युती झाल्याचं चित्र आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुधीर कोठारी आणि माजी आमदार राजू तिमांडे हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. दोघांचीही भिस्त भाजपच्या भरवशावर असल्याचे सध्यातरी दिसत आहे. भाजप आमच्याच सोबत असल्याचा दावा दोन्ही गटांनी केला आहे. मात्र भाजपने अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे भाजप नेते काय निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.

HInganghat APMC
APMC election politics : एकनाथ शिंदे गटाला भाजपपेक्षा देविदास पिंगळे लाभदायक?

नागपुरात कॉंग्रेस..

इकडे नागपूर जिल्ह्यातील रामटेक, पारशिवणी, सावनेर आणि कुही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका या टप्प्यात होऊ घातल्या आहेत. उर्वरित तालुक्यांच्या निवडणुका यानंतरच्या टप्प्यात होणार आहेत. बाजार समितीची निवडणूक सर्व पक्ष प्रतिष्ठेची करतात. सद्यःस्थितीत आता निवडणूक होऊ घातलेल्या चारही बाजार समित्यांवर कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. आगामी निवडणुकीतही ते कायम असेल, असे सध्याचे चित्र आहे.

यापूर्वीच्या टप्प्यात झालेल्या नागपूर (Nagpur) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे (Congress) नेते आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांनी दणदणीत विजय मिळविला होता. रामटेक, पारशिवणी, सावनेर आणि कुही बाजार समितींपैकी पारशिवणी आणि सावनेरवर केदारांची पकड चांगलीच मजबूत आहे. कारण सावनेर केदारांचाच मतदारसंघ आहे. कुही बाजार समितीवरही कॉंग्रेसचेच वर्चस्व आहे. राहिला प्रश्‍न रामटेकचा तर रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

HInganghat APMC
Nandurbar APMC news : भाजपला विरोधकांचे नव्हे एकनाथ शिंदे गटाचेच तगडे आव्हान!

सेवा सहकारी संस्थांसाठी सर्वसाधारण सात पदे, महिला राखीव मतदारसंघासाठी दोन पदे, विमुक्त जातीसाठी एक पद, मागासवर्गीय राखीव मतदार संघासाठी एक पद अशा एकूण ११ सदस्यांसाठी ही निवडणूक (Election) होणार असून २४३ मतदार आहेत. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघाचे दोन पद, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघाचे एक पद, आर्थिक दुर्बल मतदारसंघाचे एक पद अशी एकूण चार पदे आहेत.

ग्रामपंचायत मतदारसंघात एकूण ५०५ मतदार आहेत. अडतीया व्यापारी मतदारसंघाची दोन पदे असून यात एकूण २५७ मतदार आहेत. मापारी हमाल मतदार संघाचे एक पद असून यात ५१ मतदार आहेत. पणन प्रक्रिया सहकारी संस्था मतदारसंघाचे एक पद, असे एकूण १९ सदस्य निवडून द्यायचे आहेत.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com