Death threat to Mla Ramesh Bornare News : शिंदे गटाच्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी..

Shivsena : सध्या वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची रणधुमाळी सुरू आहे.
Mla Ramesh Bornare News,
Mla Ramesh Bornare News, Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada : शिंदे गटाचे वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र त्यांच्या वैजापूर येथील निवास्थानी पाठवण्यात आले आहे. या पत्राने एकच खळबळ उडाली असून बोरनारे यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. तसेच या धमकी पत्राची चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे.

Mla Ramesh Bornare News,
Hindu Rashtra Politics: हिंदुराष्ट्र' च्या ट्विटवरून भाजपमध्ये मतमतांतरे; मुनगंटीवार म्हणाले, ट्विटची चौकशी होणार...

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडात वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे हे देखील सहभागी झाले होते. त्यानंतर मतदारसंघात अनेकदा त्यांचे ठाकरे गटाशी खटके उडाल्याचे पहायला मिळाले होते. आता प्रा. बोरनारे (Ramesh Bornare) यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पत्र आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे हे पत्र नगर जिल्ह्यातील कर्जत येथून पाठवण्यात आले आहे. या पत्रावर कर्जत पोस्ट आॅफिसचा शिक्का असल्याचे समोर आले आहे. (Shivsena) सध्या वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची रणधुमाळी सुरू आहे. (Marathwada) आमदार बोरनारे हे मतदार व शेतकऱ्यांचा गाठीभेटी घेण्यासाठी संपर्क मोहिम राबवत आहेत. असे असतांना हे धमकीचे पत्र मिळाल्याने पोलिसांनी यांची गांभीर्याने दखल घेतली आहे.

वैजापूर येथील बोरणारे यांच्या मुरारी पार्क या निवासस्थानी हे धमकीचे पत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांचे बंधू संजय बोरणारे यांनी ते पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. निनावी असलेल्या या पत्राची तातडीने चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी देखील संजय बोरणारे यांनी पोलिसांकडे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com