ZP-PS election Reservation News
ZP-PS election Reservation Newssarkarnama

Deglur ZP Reservation News : देगलूरमध्ये व्यंकटेश गोजेगावकरांचे दोन्ही गट महिला राखीव; मातब्बरांच्या संधी हुकणार!

Local Body Election 20देगलुरातील पाच जिल्हा परिषद गटापैकी हाणेगाव खुला, मरखेल सर्वसाधारण महिला, तर खानापूर, शहापूर एससी आणि करखेड गट हा एससी महिलेसाठी राखीव झाला आहे.
Published on
Summary
  1. देगलूर तालुक्यात व्यंकटेश गोजेगावकर यांच्या दोन्ही गटांच्या जागा महिला राखीव ठरल्याने राजकीय समीकरणात मोठा बदल झाला आहे.

  2. या निर्णयामुळे स्थानिक मातब्बर नेत्यांच्या निवडणुकीच्या संधी हुकल्या असून, अनेक ठिकाणी नाराजीचे सूर उमटले आहेत.

  3. महिला आरक्षणामुळे आता नव्या चेहऱ्यांना राजकारणात प्रवेश मिळण्याची शक्यता वाढली आहे.

अनिल कदम

ZP.PS Reservation Effect News : जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर झाले आहे. जिल्हा परिषदेचे माजी गटनेते व्यकंटेश गोजेगावकर यांचे मरखेल आणि मुक्रमाबाद हे दोन्ही गट महिला राखीव झाल्याने त्यांना नवा गट शोधावा लागणार आहे. त्यांच्यासह तालुक्यातील अनेक मातब्बरांचीही संधी आजच्या सोडतीनंतर हुकणार आहे.

देगलुरातील पाच जिल्हा परिषद (Zilla Parisad) गटापैकी हाणेगाव खुला, मरखेल सर्वसाधारण महिला, तर खानापूर, शहापूर एससी आणि करखेड गट हा एससी महिलेसाठी राखीव झाला आहे. तालुक्यातील पाच जि.प. गट व पंचायत समितीच्या 10 गणांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आल्या. तालुक्यातील पाच जि.प गटापैकी हाणेगाव खुला तर मरखेल खुला (महिला) सुटले तर खानापूर, शहापूर, करडखेड हे एससी प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत.

पंचायत समितीच्या 10 गणांपैकी खानापूर, करडखेड, बेंबंरा खुल्या वर्गासाठी तर हाणेगाव खुला महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. वनाळी एससी महिला, शहापूर ओबीसी महिला, वळग एससी महिला, मरखेल एसटी महिला तर वझर गण ओबीसीसाठी (OBC) राखीव झाला आहे. तमलुर गण एससीसाठी राखीव असणार आहे. यापूर्वी 2017 मध्ये तालुक्यात खुल्या प्रवर्गासाठी खानापूर, करडखेड, शहापूर, मरखेल असे 4 गट सुटले होते .

ZP-PS election Reservation News
Local Body Election : मोठी बातमी! महाविकास आघाडीला राज ठाकरेंची साथ! शरद पवारांसोबत निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार

तर करडखेड ओबीसी पुरुषासाठी राखीव होता. पंचायत समितीच्या 10 गणांपैकी खुल्या वर्गासाठी खानापूर, करडखेड, वन्नाळी गण राखीव होता. तर शहापूर, तमलुर हे ओबीसी महिलेसाठी राखीव होते. एसटीसाठी मानूर हाणेगाव वळग गण आरक्षित होते. मरखेल गण ओबीसीसाठी आरक्षित होता. वझर एसटी पुरुषासाठी राखीव होते. या गटातील संजय वल्कले यांना सभापती होण्याचा बहुमान मिळाला होता.

ZP-PS election Reservation News
Nanded Gurudwara : ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यापूर्वी घेतलेला आणखी एक निर्णय रद्द : हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचा दणका

शहापूरमधून होणार सभापती

तालुक्यात शहापूर हा पंचायत समितीच्या गण ओबीसी महिलेसाठी आरक्षित असून पंचायत समितीचे सभापतीपद हे ओबीसी महिलेला राखीव असल्याने शहापूर गणात विजय होणाऱ्या उमेदवारास सभापती पदाचा मान मिळणार आहे. दरम्यान, जि.प.चे माजी गटनेते व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांचे मरखेल व मुक्रमाबाद हे दोन्ही गट महिलेसाठी सुटल्याने त्यांना या गटा व्यतिरिक्त इतरत्र जावे लागणार आहे. ते हाणेगाव येथेही जाऊ शकतात अशी चर्चा आहे.

पंचायत समितीवर दीर्घकाळ सत्ता गाजवणारे माजी सभापती शिवाजीराव देशमुख बळेगावकर ,नगरपरिषदेत तीन वेळेस प्रतिनिधित्व केलेले अंकुश देसाई देगावकर ,माजी सभापती माधवराव मिसाळे, रामराव नाईक, माजी जि. प. सदस्य प्रकाश पाटील बेंबरेकर, उमेश पाटील झरीकर, शिवाजीराव कनकंटे, अनिल पाटील खानापूरकर, माधवराव पाटील सुगावकर, रामदास पाटील बेंबरेकर, डॉ. विजयकुमार धुमाळे, शिवराज पाटील माळेगावकर यासह अनेकांचे गट आरक्षित झाल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे.

हाणेगाव एकमेव खुला गट

तालुक्यातला एकमेव हाणेगाव हा गट खुल्या प्रवर्गासाठी सुटल्याने या गटाचे नेतृत्व केलेले जि.प.चे माजी उपाध्यक्ष रमेश देशमुख शिळवणीकर हे रिंगणात उतरतात की मुलगा अमोल देशमुख यांना पुढे करतात? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. या गटावर भाजपाकडून माजी पं.स.सदस्य ऍड. प्रीतम देशमुख हाणेगावकर यांची दावेदारी पक्की मानली जात आहे.

FAQs (Marathi):

1. देगलूरमध्ये कोणत्या जागा महिला राखीव ठरल्या आहेत?
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील दोन्ही महत्त्वाच्या जागा या वेळी महिला राखीव झाल्या आहेत.

2. व्यंकटेश गोजेगावकर कोण आहेत?
ते देगलूरमधील प्रभावी राजकीय नेते असून, त्यांच्या दोन गटांचा स्थानिक राजकारणात प्रभाव आहे.

3. महिला आरक्षणामुळे कोणावर परिणाम झाला?
गोजेगावकर गटातील प्रमुख नेत्यांच्या उमेदवारीवर मर्यादा आल्याने त्यांच्या राजकीय संधी कमी झाल्या.

4. स्थानिक पातळीवर प्रतिक्रिया काय आहे?
शिवसेना, भाजप आणि काँग्रेस गटांमध्ये उत्सुकता आणि असंतोष दोन्हीही भावना दिसत आहेत.

5. पुढे काय होऊ शकते?
महिला आरक्षणामुळे नवीन उमेदवार पुढे येतील आणि स्थानिक राजकीय समीकरणात मोठी उलथापालथ अपेक्षित आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com